प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

तुम्हीदेखील अशा लोकांपैकी एक आहात, ज्यांना सेक्सटींग (Sexting) आवडते? सेक्सटींगच्या वेळी आपल्या पार्टनरला आपले नग्न फोटो (Nude Photo) पाठवायला आवडतात? जर आपण सेक्स (Sex) च्या रोमांचाने परिपूर्ण असलेल्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवणे आणि डर्टी टॉकिंग (Dirty Talking) करणे किती महत्त्वाचे आहे याची आपल्याला जाणीव असेलच. विशेषत: जेव्हा आपण दररोज एकमेकांना प्रत्यक्ष पाहू शकत नाही, त्यावेळी अशा सेक्सटींगचे महत्व अजूनच वाढते. अशा परिस्थितीत जोडपी एकमेकांपासून दूर राहण्याव्यतिरिक्त, एकमेकांशी डर्टी टॉकिंग  करून तसेच एकमेकांचे नग्न फोटो शेअर करून आपल्या मनाला शांत करतात. आपला बिघडलेला मूड ठीक करण्यासाठीही याचा फायदा होतो.

मात्र हे इतके सोपे नाही. जर सेक्सटींग योग्य मार्गाने केले गेले नाही, तर तुम्हाला हवे ते सुख मिळणे अवघड ठरू शकते. त्यामुळे सेक्सटींग करताना पार्टनरला हॉट न्यूड फोटो शेअर करण्यासाठी या टिप्सचा फायदा होऊ शकतो.

योग्य जागा –

सेक्सटींग दरम्यान योग्य जागा निवडणे फार महत्वाचे आहे. यासाठी आपण आपले वॉशरूम किंवा बेडरूमची निवड करू शकता. ही दोन कामुक ठिकाणे आहेत जिथे आपण सेक्सटींग दरम्यान पार्टनरबरोबर फोन सेक्स अथवा मेसेज सेक्स करू शकता. तसेच यावेळी जोडीदाराला नग्न फोटो पाठवणेही सोपे ठरू शकेल.

योग्य कपडे –

मादक आणि सेक्सी कपडे परिधान करून तुम्ही सेक्सिंगचा दुप्पट आनंद घेऊ शकता. सेक्सिंगसाठी फक्त अंतर्वस्त्रे हा एक उत्तम पर्याय आहे, परंतु आपल्याला हव्या असल्यास आपण इतरही सेक्सी कपड्यांचा वापर करून आपल्या जोडीदाराला पुन्हा एकदा आपली भुरळ पडू शकता.

फोटोमधील पोझ –

आपण सेक्सटींगदरम्यान आकर्षक, रचनात्मक, मादक, सेक्सी पोझेसद्वारे काढलेले फोटोज आपल्या पार्टनर पाठवू शकता. असे फोटोज पाहून तुमच्या जोडीदाराचा मूड नक्कीच सेट होईल. तसे असे फोटोज तुमच्या सेक्सटींगमधील मजा अजून वाढवू शकतात. (हेही वाचा: Boyfriend, Sex, Orgasm महिलांना नक्की काय हवं असतं? Tinder चा हा व्हिडीओ आहे सर्व प्रश्नांचं उत्तर (Watch Video)

टेक्स्ट –

सेक्सटींगदरम्यान, आपल्या जोडीदाराला नग्न फोटोंसह काहीतरी डर्टी लिहून पाठवा. अशा गोष्टींमुळे प्रणयरम्यपणाचा मोह अजून वाढू शकतो. एकमेकांचे नग्न फोटो आणि त्यासोबत डर्टी सेक्स चॅट नक्कीच तुम्हाला एकत्र सेक्स अनुभवल्याचा आनंद देतील

(टीप - या लेखात नमूद केलेल्या गोष्टी फक्त माहितीच्या उद्देशाने लिहिल्या आहेत. याची वास्तविकता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची आम्ही हमी देत नाही.)