Sexting म्हणजे नक्की काय? कोणी तुम्हाला Sexting करण्यास भाग पाडत असेल तर काय कराल?
आपण नेहमीच आपल्या नात्यात सुरक्षित अंतर आणि आदर बाळगण्यास पात्र आहात. त्यामुळे स्वतःला खाली नमूद केलेले हे प्रश्न जरूर विचारा
What Is Sexting?सेक्सटींगबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? सेक्सटींग किंवा सेक्स टेक्सटींग याचा अर्थ असा आहे की, सेक्स किंवा त्यासंबंधित असणारे मेसेजेस आपल्या मोबाईलवरून दुसऱ्या व्यक्तीला पाठवणे. आजकालच्या या डिजिटल युगात कुठूनही कुठल्याही व्यक्तीशी सहज संपर्क साधता येतो. अशावेळेस अनेकजण, आपल्या पार्टनरसोबत याच डिजीटल उपकरणांचा वापर करून सेक्शुअल गप्पा देखील मारतात. कितीही व्यस्त असणारी व्यक्ती देखील त्यासाठी मात्र बरोबर वेळ काढते. याचे प्रमाण युवा पिढीत जास्त दिसून येत आहे. चला तर पाहूया या सेक्सटिंगविषयी सविस्तर माहिती.
जर मला कोणी सेक्सटिंग करण्यास सांगत असेल तर मी काय करावे?
तुमच्या प्रियकराने किंवा मित्र- मैत्रिणीने तुम्हाला नग्न छायाचित्रे पाठवल्यास किंवा पाठवायला सांगितल्यास? कोणत्याही प्रकारच्या लैंगिक वर्तनाला नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आपण नेहमीच आपल्या नात्यात सुरक्षित अंतर आणि आदर बाळगण्यास पात्र आहात. त्यामुळे स्वतःला खाली नमूद केलेले हे प्रश्न जरूर विचारा
कायदेशीर आहे का? 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांचे नग्न किंवा लैंगिक फोटो पाठवणे, डाउनलोड करणे किंवा लैंगिक फोटो क्लीक करणे सामान्यत: बेकायदेशीर आहे. अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो कधीही पाठवू नका, डाउनलोड करू नका.
तुम्हालाही ते पाहिजे का? आपण इच्छित नसताना कोणी आपल्यावर सेक्स्ट मेसेज पाठविण्यासाठी दबाव आणत असल्यास किंवा ते आपले खाजगी फोटो किंवा मजकूर शेअर करण्याची धमकी देत असतील तर ते आपल्या निर्णयाचा आदर करीत नाहीत. त्यामुळे हे एक अनहेल्दी नाते असल्याचे लक्षण आहे.
Sexual Consent म्हणजे काय? लैंगिक संबंधात जोडीदाराची संमती का महत्वाची मानली जाते, घ्या जाणून घ्या
ते शेअर होईल का? हा खरंतर सर्वात कठीण प्रश्न आहे, कारण याचे उत्तर आपल्याला बर्याचदा माहित नसते. जेव्हा आपण एखाद्याला मजकूर पाठवताना विश्वास ठेवता तेव्हा कधीही आपले खाजगी मेसेज समोरची व्यक्ती सिक्रेट ठेवेल अशी कल्पना करू नका. भांडण किंवा ब्रेकअप नंतर, समोरची व्यक्ती हे सेक्सट्स शेअर करू शकते. जरी समोरच्या व्यक्तीने कोणत्याही हेतूसाठी आपले खाजगी फोटो शेअर केले नाहीत, तरीही त्यांचा फोन एखाद्या मित्राद्वारे, हरवल्यावर, चोरीला गेल्यावर किंवा हॅक झाल्यावर तुमचे फोटो व तुमची माहिती तुमच्या संमतीशिवाय शेअर केली जाऊ शकते.