Husband Wife Love Viral Video: नवरा-बायकोच्या प्रेमाला, शब्द कशाला? कृतीच सगळे सांगून जाते; पाहा हृदयस्पर्षी व्हिडिओ

नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्षी व्हिडिओ ( Husband Wife Love Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटीझन्सनी या व्हिडिओचे मोकळ्या अंत:करणाने स्वागत केले आहे.

Husband Wife Love Viral Video: नवरा-बायकोच्या प्रेमाला, शब्द कशाला? कृतीच सगळे सांगून जाते; पाहा हृदयस्पर्षी व्हिडिओ
Husband Wife Relationship | (Photo Credit - Twitter)

नवरा बायकोचे नाते (Husband Wife Relationship) म्हणजे उन सावलीचा पाठशिवणीचा खेळ. कधी रुसवा, कधी रुसवा फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्षी व्हिडिओ ( Husband Wife Love Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटीझन्सनी या व्हिडिओचे मोकळ्या अंत:करणाने स्वागत केले आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसणारा पुरुष आणि महिला यांच्या एकमेकांप्रती असलेल्या नात्याबद्दल नेमकी वस्तुस्थीती समजू शकली नाही. परंतू, इंटरनेटवर अनेकांनी हे जोडपे पतीपत्नीच असावे असा कयास लावला आहे. व्हिडित पाहायला मिळते की, एक जोडपे एका दुकानासमोर बसले आहे. बहुदा ते कोणत्या तरी स्टेशनवर आहेत. पुरुष निवात बसला आहे. त्याच्या मांडीवर पांघरुन घेऊन एक महिला शांत झोपली आहे. पुरुष अत्यंत प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटतो आहे. त्याचा चेहरा अत्यंत शांत आहे. या शांत चेहरा आणि कृतीने इंटरनेटवर अनेकांना प्रभावीत केले आहे. (हेही वाचा, Wife Beats Husband: वाचवा! बायको खूपच मारते हो, त्रस्त नवऱ्याकडून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार)

व्हिडिओ

सोशल मीडिया मंचावर @Gulzar_sahab या ट्विटर युजरने अपलोड केलेल्या या व्हिडिओला नेटीझन्सनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत हा हृदयस्पर्शी व्हिडिओ 10.6k पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. पाहणाऱ्यांची ही संख्या आणखी वाढतेच आहे. हृदयस्पर्शी व्हिडिओ सर्वांना आवडला आहे हे वेगळे सांगायला नको. या व्हिडओखाली हृदय आणि लव्ह-स्ट्रक इमोजींनी प्रतिक्रियांचा बॉक्स भरलेला आहे. एका युजर्सने म्हटले आहे, काही सेकंदात, खऱ्या प्रेमाची व्याख्या वर्णन केली आहे. दुसरा युजर्स म्हणतो, मला एक दिवस असे खरे प्रेम पाहायला मिळावे अशी माझी इच्छा आहे. आणखी एक युजर्स म्हणतो, यालाच मी खरे प्रेम म्हणतो.

(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2022 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).