Valentine Week 2021, Hug Day Gift Ideas: ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला, जोडीदाराला द्या खास गिफ्ट; हग डे निमित्त जाणून घ्या 'मिठी'चा अर्थ
या काळात मिठी मारण्याचा खास उत्सवच काही मंडळी साजरी करतात. त्यात व्हॅलेंटाईन सप्ताहात हग डे (Hug Day) हा विशेष दिवस साजरा केला जातो. हग डे (Hug Day 2021) निमित्त जाणून घ्या अर्थ 'मिठी'चा. ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला, जोडीदाराला द्या खास गिफ्ट.
Hug Day Gift Ideas: नाते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे. नाते नैतिक असो वा अनैतिक. नाते सर्वसामान्य असो किवा व्यावसायिक. या सर्वात अधिक दृढता आणते ते आलिंगन. सरळ साध्या सोप्या भाषेत मिठी अथवा गळाभेट. गळाभेट कोण कोणासोबत घेतं यावरही बरंच काही अवलंबून असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश-विदेशातील राष्ट्रप्रमुखांना मारलेली मिठी ही गळाभेट ठरते. पण प्रेयसिने प्रियकराला मारलेली मिठी हे आलिंगन ठरते. दोन मित्र किंवा योद्धे (जिंकल्यावर) जेव्हा एकमेकांची गळाभेट होते त्यालाही आलिंगन म्हणतात. खेळाच्या मैदानावर हा प्रसंग अनेकदा पाहायला मिळतो. व्हॅलेंटाईन सप्ताह (Valentine Week) हा तर प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी खास पर्वणीच. या काळात मिठी मारण्याचा खास उत्सवच काही मंडळी साजरी करतात. त्यात व्हॅलेंटाईन सप्ताहात हग डे (Hug Day) हा विशेष दिवस साजरा केला जातो. हग डे (Hug Day 2021) निमित्त जाणून घ्या अर्थ 'मिठी'चा. ब्रिंग इट ऑन.. चला आलिंगनाला, जोडीदाराला द्या खास गिफ्ट.
सोबतची मिठी (Side Hug)
एकमेकांच्या शेजारी उभे राहून अथवा चालतना एकमेकांच्या खाद्यावर हात, मान टाकून सोबतीने उभे राहणे अथवा चालणे हे 'सोबतची मिठी' या प्रकारात मोडते. सोबतची मिठी हा शब्द काही आलिंगणाचा प्रकार नाही. हा शब्द केवळ संकल्पना व्यक्त करतो. त्यामुळे विविध प्रांत, भौगोलीक रचना यामुळे या संकल्पनेला वेगळे शब्द असू शकतात.
फारसे सख्य नसलेले परंतू दैनंदिन सोबत असलेले लोक अशा प्रकारची मिठी मारतात. सोबत असूनही सोबत (मनाने) नसलेले किंवा सामाजिक बंधणे पाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न करत असलेले जोडपे, जोडीदार अशा प्रकारची मिठी मारतात. असे लोक प्रामुख्याने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, अशा सार्वजनिक ठिकाणी आढळू शकतात.
मित्रत्वाची मिठी अथवा आलिंगन (Friend Hug)
अनेकदा ही मिठी आपल्या जोडीदाराला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा कामगिरीवर जाण्यासाठी निरोप देताना वापरली जाते. अशा प्रकारच्या आलिंगनात जोडीदार एकमेकांच्या समोर असतात. इतके की ते एकमेकांना एकमेकांच्या छातीचा स्पर्श होईल अशा पद्धतीने उभा राहतात आणि एका हाताने जोडीदाराच्या पाठिला विळखा घालून दुसऱ्या हाताने जोडीदाराच्या पाठीवर थोपटत असतात. महत्त्वाचे म्हणजे या मिठीत लैंगिक अर्थ नसतो. प्रामुख्याने अशा प्रकारचे आलिंगन खेळाच्या मैदानावर अथवा विजयी झाल्यावर आनंद साजरा करताना दिसते.
पाठिमागून मारलेली मिठी (Hugging From Behind)
अशा प्रकारचे आलिंगन अथवा मिठी एकाच प्रकारे मारली जाते. परंतू, मिठी मारणाऱ्या दोन व्यक्ती यांच्यात नाते कोणत्या प्रकारचे आहे यावर त्याचे अर्थ अवलंबून असतात. प्रेयसीला प्रियकराने अशा प्रकारची मिटी मारली तर ती रोमँटीक ठरते. आईने आपल्या मुलांना मारेलेली अशा प्रकारची मिठी वात्सल्य व्यक्त करते. कार्यालयात दोन सहकाऱ्यांनी एकमेकांना अशा प्रकारची मिठी मारली तर ती भविष्यासाठी निर्माण केलेली जवळीक ठरु शकते. परंतू, अनेकदा अशा प्रकारची मिठी ही नैतिकदृष्ट्या चुकीची ठरु शकते. उदा. कार्यालयात दोन महिला सहकारी, दोन पुरुष सरकारी अथवा महिला आणि पुरुष सरकारी यांनी एकमेकांना अशा प्रकारची मिठी परवानगिशिवाय अथवा अनुचीत ठिकाणी मारली तर ती अनैतिक ठरु शकते.
रोमँटीक आलिंगन, कमरेभोवती मारलेली मिठी ( Hugging Around the Waist)
एकमेकांसोमोर उभे राहून अथवा कमरेखालचा भाक एकमेकांना स्पर्ष होईल अशा स्थितीत परंतू आपले खांदे परस्परांपासून काही अंतर ठेऊन उभे राहून एकमेकांना बाहुपाशात घेतले असता ती मिठी रोमँटीक ठरु शकते. या मिठीचे वर्णन शब्दात करणे काहीसे कठिण आहे. कारण शक्यतो प्रियकर प्रेयसी अथवा एकमेकांना आवडणाऱ्या दोन व्यक्ती अत्यंत भावोत्कट क्षणी अशा प्रकारची मिठी एकमेकांना मारतात.
घट्ट मिठी (Bear Hug)
एकमेकांसमोर उभे राहून जोडीदार एकमेकांना गच्चपणे बाहुपाशात घेतात. या प्रकाराला घट्ट मिठी किंवा इंग्रजीत Bear Hug असे म्हणतात. अत्यंत भावत्कट क्षणी अशा प्रकारची मिठी मारली जाते. जेव्हा जोडीदार एकमेकांना सर्वस्व अर्पण करतात तेव्हा अशा मिठीचा प्रामख्याने वापर केला जातो. तसेच, आपल्या मनातील सर्वोच्च गोष्ट मिळवल्यानंतरही अशा प्रकारची मिठी मारतात. त्यामुळे अशा प्रकारची मिठी खासगी आनंद साजरा करताना जितक्या उत्कटतेने मारली जाऊ शकते. तितक्याच उत्कटचने एखादा सामना जिंकल्यावर खेळाडूही एकमेकांना मारतात. विजयी योद्धेही एकमेकांना अशा प्रकारची मिठी मारतात.
दरम्यान, मिठी मारण्याचे अनेक फायदे असतात तसे तोटेही असतात. मिठी मारल्याने भावना व्यक्त होतात. समोरच्या व्यक्तीप्रती आपल्या मनात किती आदर आहे हेसुद्धा स्पष्ट होते. तसेच, नात्याचा एक आधार मिळतो. दुसऱ्या बाजूला मिठी मारताना योग्य भान ठेवले नाही तर समोरच्या व्यक्तीला असुरक्षीत वाटू शकते. कधीकधी अशा प्रकारची मिठी समोरच्याला विचित्र आणि आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करायला लावणारी ठरु शकते. त्यामुळे व्हॅलेंटाईन सप्ताहात आणि हग डे निमित्त कोणालाही मिठी मारताना जरा सांभाळूनच करा.