Break Up झाल्यावर पुन्हा त्याच नात्यात अडकायचे आहे ? तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा
आपल्या जवळच्या माणसासोबत ब्रेकअप झाल्यास त्या व्यक्तीच्या आठवणीत आपण आपले दैनंदिन जीवन सुरळीत जगण्याचे विसरुन जातो.
आपल्या जवळच्या माणसासोबत ब्रेकअप झाल्यास त्या व्यक्तीच्या आठवणीत आपण आपले दैनंदिन जीवन सुरळीत जगण्याचे विसरुन जातो. तसेच काही जण तर ब्रेकअप नंतर गैरमार्गांवर जाण्याचा विचार करतात. मात्र असे केल्याने प्रिय व्यक्ती पुन्हा आयुष्यात परत येत नाही.
एखाद्या वक्तीचे ब्रेकअप झाल्यानंतर काहींना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. तर काहीजण आपल्याकडून झालेली चूक मान्य करत पुन्हा एकदा नात्यात येण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे जर तुमचे ब्रेकअप झाले असल्यास तुम्हाला पुन्हा त्याच नात्यात अडकायचे असल्यास पुढील या गोष्टी जरुर करा.
>कोणत्याही परिस्थितीत धैर्य ठेवा:
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या भावनांवर संयम ठेवणे फार महत्वाचे आहे. तसेच नाते तुटल्याचे दु:ख तुम्हाला होत असते, तेवढेच दुख समोरच्या व्यक्तीला सुद्धा होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चुकीचे पाऊल न उचलता स्वत: तेव्हा धैर्याने वागा.
>सोशल मीडियात पोस्ट करु नका:
ब्रेकअप झाल्यावर बहुतांश जण त्यांचे दु:ख व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियात दु:खी पोस्ट शेअर करतात. मात्र असे करु नका. त्यामुळे समोरचा व्यक्ती अधिक दुखावला जाऊ शकतो.
>एक्सपर्टकडून सल्ला घ्या:
नात्यात फूट पडल्यास लोक तणावाखाली जगातात. त्यामुळे अशा स्थितीत एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊन तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही वागल्यास तुमच्यात सकारत्मकता वाढण्यास सुरुवात होईल.
> स्टॉक करणे बंद करा:
ब्रेकअप नंतर दुखी झालेला व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सोशल मीडियात स्टॉक करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे काही वेळासाठी स्वत:ला सोशल मीडियापासून दुर ठेवल्यास उत्तम. तर सोशल मीडियात तुम्ही सक्रिय न दिसल्यास समोरच्या व्यक्तीकडून तुमच्याबद्दल विचारपूस केली जाऊ शकते.
(Break Up झाल्यावर चुकूनसुद्धा करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल)
त्यामुळे पुन्हा एकदा प्रेयसी किंवा प्रियकरासोबत पॅचअप करायचे असल्यास वरील गोष्टी जरुर लक्षात ठेवा. कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला वारंवार एक नवीन संधी मिळत असते. तर आयुष्य हे खुप अनमोल असून त्याचा प्रत्येक गोष्टीतून आनंद घ्यायला शिका.