Tinder ने समलैंगिक युजर्ससाठी लॉन्च केले नवं 'Traveller Alert' सेफ्टी फिचर

सध्या तरुणाईमध्ये डेटिंगसाठी सोशल मीडियात विविध अॅप सुरु करण्यात आले आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीला अॅपच्या माध्यमातून आपल्याला ती व्यक्ती आवडली आहे असे दर्शवणारे एक फिचर देण्यात येते. त्यामुळेच तरुणाईमध्ये ऑनलाईन डेटिंग अॅप (Online Dating App) ट्रेंन्ड बनला आहे.

Tinder ने समलैंगिक युजर्ससाठी लॉन्च केले नवं 'Traveller Alert' सेफ्टी फिचर
Tinder App (Photo Credits-Twitter)

सध्या तरुणाईमध्ये डेटिंगसाठी सोशल मीडियात विविध अॅप सुरु करण्यात आले आहेत. एखाद्या अनोळखी व्यक्तीला अॅपच्या माध्यमातून आपल्याला ती व्यक्ती आवडली आहे असे दर्शवणारे एक फिचर देण्यात येते. त्यामुळेच तरुणाईमध्ये ऑनलाईन डेटिंग अॅप (Online Dating) ट्रेंन्ड बनला आहे. यामधीलच एक ग्लोबल ऑनलाईन डेटिंग अॅप टिंडर (Tinder)  यांनी एक नवे  Traveller Alert नावाचे फिचर आणले आहे.

टिंडरच्या मदतीने ऑनलाईन डेटिंगसाठी वाव मिळाला आहे. या अॅपच्या मदतीने दोन अनोखळी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधू शकत होते. परंतु गुरुवारी टिंडर अॅपने समलैंगिक (LGBTQ) युजर्ससाठी एक नवं सेफ्टी फिचर (Safety Feature) आणले आहे. टिंडर यांच्या मते सेफ्टी फिचरचे उद्देश असा आहे की, विविध देशातील समलैंगिक नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तींच्या नात्याची गुप्तता पाळणे असा आहे. मात्र अद्याप जगभरातील काही देशात समलैंगिक नातेसंबंधाला मान्यता देण्यात आलेली नाही.(बॉयफ्रेंडशी लग्न झाल्यास या '5' गोष्टी बदलतात!)

तर या नव्या फिचरसाठी 'ट्रॅव्हलर अलर्ट' (Traveller Alert) असे नाव देण्यात आले आहे. तर या फिचरच्या सहाय्याने समलैंगिक व्यक्ती ज्या देशात ऑनलाईन डेटिंगसाठी याचा उपयोग करेल, त्यावेळी तेथील समलैंगिक व्यक्ती कशा पद्धतीने समस्यांचा सामना करत आहेत हे कळणार आहे. तसेच टिंडरवरील समलैंगिक युजर्सनी काही गोष्टींबाबत सावधानी बाळगणे अत्यावश्यक आहे. कारण अन्य काही देशात समलैंगिक संबंधांना परवानगी नसल्याने कोणत्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे दाखवले जाणार आहे. त्याचसोबत कोणत्या गोष्टींबद्दल  गुप्तता ठेवणे आवश्यक आहे हे सुद्धा  सांगण्यात आहे. सेफ्टी फिचर अॅन्ड्रॉइड आणि आयओएससाठी सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us