प्रेमसंबंधात 'या' कारणांमुळे तुम्ही दुरावले तर जात नाहीत ना?
तसेच मात्र एखादा व्यक्तीला आपली प्रेयसी किंवा प्रियकर अधिकच दबाब टाकत असल्याचे कळले तरीही त्याच्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करते.
प्रेमाचे नाते म्हटले की एकमेकांचे रुसवे-फुगवे पुरवण्याचे नखरेच फार पाहायला मिळतात. तसेच एखाद्या व्यक्तीला आपली प्रेयसी किंवा प्रियकर अधिकच दबाब टाकत असल्याचे जाणवले तरीही सध्याच्या काळात त्याच्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतात. त्याचसोबत नात्यांमधील अन्य काही गोष्टींमुळे ही दोघांमध्ये दुरावा येत असल्याचे दिसून येते. काळांतराने दोघांमधील दुराव्याचे ब्रेकअपमध्ये रुपांतर झाल्याचे समोर येते.
परंतु एकमेकांच्या दुराव्यामध्ये किती अडथळे किंवा काय कारणे आहेत याबद्दल जास्त विचार केला जात नाही. तर एकमेकांना एकमेकांचे विचार न पटू लागल्यास वादाला सुरुवात होते. मात्र एकमेकांमधील चुका बाजूला सारत कोण किती चुकीचे आहे याकडे बोट दाखवले जाते. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊन काही सुचेनासे होते. तर जाणून घ्या तुमच्या नात्यात जर दुरावा येत असल्यास 'ही' काही कारणे त्यासाठी कारणीभुत नाहीत ना?
- नव्या ठिकाणी नोकरी, प्रमोशन किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचा आनंद आपला पार्टनर व्यक्त करत नसल्यास समजून जावे काहीतरी बिनसले आहे. परंतु लक्षात असू द्या की, पार्टनरच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी विचार करा.
-तुमच्या पार्टनरची तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. तर सोशल मीडियात तुम्ही एक्टिव्ह असूनही पार्टनरला दुर्लक्ष केल्यास त्यामुळे सुद्धा दोघांमध्ये वाद होऊ शकतात.
- दिवसभर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्याचे कारण देत असाल तर तुमच्या नात्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
-पहिल्याच भेटीत झालेला संवाद आणि आता सुरु असलेल्या रिलेशनशिपमध्ये खुप बदल झालेले दिसून येतात. तर एकमेकांच्या गरजा समजून न घेतल्यास परिणामी नात्यात फूट पडण्यास सुरुवात होते.
(Monsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज)
त्यामुळे तुम्हाला जर नाते जपून ठेवायचे असल्यास पार्टनरचा विश्वास तुटणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, तसेच वरील काही कारणांमुळे तुम्हाला नात्यात दुरावा येत असल्याचे जाणवल्यास त्यासंबंधित पार्टनरसोबत आपले मत व्यक्त करा.