पहिल्यांदा सेक्स करताय? त्रासदायक ठरू शकतो First Time Sex चा अनुभव; वेदना टाळण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स
पहिल्यांदा सेक्स (Sex) करण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी खूप विशेष आहे. बऱ्याच लोकांसाठी पहिल्या सेक्सचे क्षण हे जीवन बदलणारे क्षणही ठरतात. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या सेक्सचा अनुभव विसरत नाहीत.
First Time Sex: पहिल्यांदा सेक्स (Sex) करण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी खूप विशेष आहे. बऱ्याच लोकांसाठी पहिल्या सेक्सचे क्षण हे जीवन बदलणारे क्षणही ठरतात. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या सेक्सचा अनुभव विसरत नाहीत. प्रथमच सेक्स करणे म्हणजे आपले कौमार्य गमावणे. पहिल्यांदा सेक्स करताना महिला किंवा पुरुष आपले कौमार्य गमावतो, त्यामुळे पहिल्या सेक्सचा अनुभव बर्याच लोकांना त्रासदायक ठरू शकतो. प्रथमच सेक्स केल्याने प्रायव्हेट पार्टसना दुखापत होऊ शकते आणि ती वेदनादायक ठरू शकते. यासाठी प्रथमच संभोग करण्यापूर्वी, स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदा सेक्स करणार असाल तर या टिप्स (Sex Tips) तुमच्या वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात.
घाई करू नका -
प्रथमच संभोग करणे थोडे वेदनादायक असू शकते, परंतु त्यास वेदनारहित संस्मरणीय अनुभव बनवायचा असेल तर आपल्याला उतावीळपणा किंवा घाई न करता सेक्स करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा सेक्स करताना हळू हळू सेक्सचा अनुभव घ्या. प्रथम संभोगाच्या वेळी अति उत्साह आणि उत्तेजनामुळे खाजगी भागाचे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे लैंगिक क्रिया अधिक अवघड वाटू लागते. हे टाळण्यासाठी घाई करू नका आणि सर्व क्रिया सावकाश करा.
हायमेन स्ट्रेच करा -
प्रथम संभोगादरम्यान एक अस्थिर हायमन (Unstretched Hymen) देखील वेदना देण्यास कारणीभूत ठरू शकते. हायमेन हा महिलांच्या योनीचा बाह्य थर आहे, जो पहिल्या संभोगाच्या वेळी फाटू शकतो. परंतु, विविध प्रकारच्या शारीरिक हालचालींमुळे बर्याच स्त्रियांचे हायमेन आधीच तुटलेले असते. पहिल्यांदा सेक्स करण्याआधी स्त्रियांनी बोटांच्या सहाय्याने हायमेन थोडे ताणने फायद्याचे ठरू शकते. यासाठी आपण ल्युबदेखील वापरू शकता.
फोरप्ले महत्वाचा आहे -
जेव्हा एखादी स्त्री उत्साहित होते, तेव्हा तिचा प्रायव्हेट पार्ट नैसर्गिकरित्या ल्यूब्रिकेट होतो. या प्रकरणात, लैंगिक वेदना कमी करण्यासाठी प्रथमच फोरप्ले करा. फोरप्ले केवळ वेदनाच कमी करतो असे नाही, तर दोन जीवांना शरीराने आणि मनानेही जवळ आणतो. या क्रियेत दोघांच्या आवडीनिवडी समजतात तसेच संभोगापेक्षा फोरप्ले मुळेच स्त्रिया अधिक उत्तेजित होतात. त्यामुळे त्यानंतर संभोगाचा आनंद दोघेहीजण वेदनारहितपणे घेऊ शकतात. (हेही वाचा: Boaring Sex Life? शरीर संबंधाआधी महत्वाच्या आहेत या गोष्टी; जोडीदाराला खुश करण्यासाठी अशी करा तयारी)
विशेष म्हणजे पहिल्या सेक्ससाठी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेची निवड केल्याने आपला तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. यासह, अशी विशेष काळजी घ्या जेणेकरून आपल्या जोडीदारास लैंगिक संबंधामध्ये आराम वाटेल. लैंगिकतेच्या अधिक चांगल्या अनुभवासाठी जोडीदाराची उत्स्फूर्तता आणि इच्छा दोन्ही आवश्यक आहेत.
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)