वारंवार Sex केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते का? जाणून घ्या सविस्तर

सेक्स हा मुळात शारीरिक श्रमाचा भाग असल्यामुळे सेक्स हा आपल्या शरीरासाठी चांगला असल्याचे किंवा वारंवार सेक्स केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेकांचे म्हणणे असते

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

सेक्स (Sex) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा आणि खाजगी विषय आहे. त्यामुळे सर्वजण हा विषय मनमोकळेपणाने बोलतात असे नाही. सेक्स हा मुळात शारीरिक श्रमाचा भाग असल्यामुळे सेक्स हा आपल्या शरीरासाठी चांगला असल्याचे किंवा वारंवार सेक्स केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र याचे नीट उत्तर अजूनपर्यंत कोणाला मिळालेले नाही. यावर देशविदेशातील तज्ज्ञांचे वेगवेगळे मत आहे. असे म्हणण्यामागे नेमकं कारण काय हे तज्ज्ञांना देखील न उलगडलेलं कोडं आहे. मात्र यात शारीरिक क्रियेचा संबंध असल्यामुळे सेक्सचा नक्कीच तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

सेक्सदरम्यान शारीरिक हालचालीचा समावेश असतो ज्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास थोड्याफार प्रमाणात होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण सेक्सदरम्यान शरीरातील पांढ-या पेशी वाढतात ज्याचा परिणाम रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर होतो. मात्र केवळ हा विचार करुन सेक्स करत असाल तर त्यामुळे जोडप्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतो ज्यामुळे तुमच्यामधील रोगप्रतिकार शक्ती कमी देखील होऊ शकते. Coronavirus And Sex: संभोग केल्याने कोरोना व्हायरस होतो का? अनेकांना पडलाय प्रश्न, उत्तर काय?

जर्मनीच्या वैद्यकिय विभागाने हस्तमैथुन करण्याचा फायदा तुमच्या शरीरावर होतो. तर न्युयॉर्कच्या तज्ज्ञानुसार यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढतेच असे नाही. पण यामुळे तुम्हाला इन्फेक्शन विरुद्ध लढण्यास मदत होते.

तर जर्मनीतील तज्ज्ञांनुसार, चांगले सेक्स करणे हे नेहमीच शरीरासाठी आरोग्यदायी आहे. यात शरीरासाठी हालचाल होत असल्या कारणाने तुमचे हाडे, मसल्स मजबूत होतात. ज्यामुळे तुम्हाला पाठदुखी, कंबरदुखी यांसारख्या समस्या उद्भवत नाही. वारंवार सेक्स केल्याने पायाचे हाड, ओटीपोटीचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते. पण याचा अर्थ तुम्ही रोज सेक्स करणे गरजेचे आहे असे नाही.

तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ, फळे खा, तुमचे हात स्वच्छ धुवा, रोज व्यायाम करा आणि हो त्यासोबत सेक्सही करा ज्यात एक वेगळीच मजा आणि एका वेगळा अनुभव मिळतो.