Sex Tips: सेक्सनंतर पुरुषांनी आपल्या महिला पार्टनरसोबत न विसरता करा 'या' गोष्टी जे व्यक्त करेल तुमचे तिच्यावरील जिवापाड प्रेम
सेक्स दरम्यान महिला आणि पुरुष दोघांचेही शरीर थकून गेले असते. अशा वेळी महिलेला पुरुषाची सहानुभूतीपूर्व प्रेमळ स्पर्श हवाहवासा वाटतो. ज्यामुळे तिच्या मनावर आलेले दडपण, मनातील भीती कमी होते. त्यामुळे संभोगानंतर काही ठराविक गोष्टी पुरुषांनी आपल्या महिला पार्टनर सोबत केल्या तर त्यांना छान वाटेल.
सेक्ससाठी महिलां (Sex) च्या मनाची तयारी होणे जितके गरजेचे असते तितकेच तिला त्या सेक्स दरम्यान व सेक्सनंतर चांगला अनुभव देणे देखील गरजेचे असते. पुरुष जोडीदाराचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे याचे प्रत्येक महिला निरीक्षण करत असते. आपला पुरुष जोडीदार आपल्याकडे केवळ शारीरिक सुखाची गरज म्हणून पाहतो की आपल्यावर त्याचे खरेच प्रेम आहे हे ती सतत पाहत असते. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे नाते टिकवायचे असेल वा तुमच्या महिला पार्टनरने प्रत्येक सेक्स दरम्यान तुम्हाला Orgasm चा अनुभव द्यावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सेक्स दरम्यान महिला आणि पुरुष दोघांचेही शरीर थकून गेले असते. अशा वेळी महिलेला पुरुषाची सहानुभूतीपूर्व प्रेमळ स्पर्श हवाहवासा वाटतो. ज्यामुळे तिच्या मनावर आलेले दडपण, मनातील भीती कमी होते. त्यामुळे संभोगानंतर काही ठराविक गोष्टी पुरुषांनी आपल्या महिला पार्टनर सोबत केल्या तर त्यांना छान वाटेल.
1. सेक्स नंतर महिला जोडीदाराची स्तुती करा
सेक्स नंतर थोडेसे रोमँटिक होऊन तुमच्या जोडीदाराची थोडी स्तुती करा. तिचे रूप, तिचे बोलणे याबाबत थोडं कोडकौतुक करा. तिला चांगले वाटेल.हेदेखील वाचा- Sex Tips: रटाळ झालेली सेक्स लाईफ रंजक वळणावर आणण्यासाठी 'या' टिप्सची होईल मदत
2. सेक्स नंतर तिच्याशी थोडा वेळ बोला
सेक्सनंतर लगेच झोपून न जाता आपल्या महिला जोडीदाराशी थोडा वेळ मनसोक्त बोला. तसेच तिलाही मनमोकळेपणाने बोलू द्या. यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल.
3. तिला फ्रेश होण्यास मदत करा
सेक्स नंतर तुमच्या महिला जोडीदारास फ्रेश व्हायचे असेल तर तिला थोडी मदत करा. यात तुम्ही बाथरूममध्ये शॉवर खाली तिला छान मसाज देऊ शकता. ज्यामुळे तिला देखील हलके वाटेल.
4. सेक्सनंतर तिचे चुंबन घ्या
सेक्सनंतर तिला बोलता बोलता अधूनमधून चुंबन द्या. तुमचा प्रेमाचा किस सुद्धा तुमचे तिच्यावर जिवापाड प्रेम आहे हे दर्शवतो.
5. तिला मिठीत घेऊन झोपा
सेक्सनंतर वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन वा वेगवेगळं न झोपता तिला तुमच्या घट्ट मिठीत घेऊन झोपा.
या गोष्टी खूपच रोमँटिक असून या तुमच्या मनातील भावना तुमच्या महिला पार्टनरसमोर व्यक्त करतील. ज्यामुळे आपला जोडीदार हा आपल्याकडे केवळ शारीरिक सुखाची गोष्ट न पाहता आपल्यावर नितांत प्रेम करतो असे तिला वाटेल. जे तुमच्या घट्ट नात्यासाठी खूप उपयोगी ठरेल.
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2020 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

