Sex Tips: सेक्सदरम्यान चुकुनही करू नका लाळ, व्हॅसलीन, नारळ तेल किंवा लोशनचा वापर; जाणून घ्या होणारे दुष्परिणाम
याच्या उपयोगाने सेक्स दरम्यान वेदना होत नाही. संभोग करताना ल्युबचा वापर घर्षण कमी करण्यासाठी केला जातो. कधीकधी स्त्रीची योनी ओली नसते, त्या जागी प्रचंड ड्रायनेस असतो
ल्युब (Lubrication) हा सेक्सचा (Sex) एक महत्त्वाचा भाग आहे. याच्या उपयोगाने सेक्स दरम्यान वेदना होत नाही. संभोग करताना ल्युबचा वापर घर्षण कमी करण्यासाठी केला जातो. कधीकधी स्त्रीची योनी ओली नसते, त्या जागी प्रचंड ड्रायनेस असतो, ज्यामुळे संभोग करताना खूप वेदना होऊ शकतात. या वेदना टाळण्यासाठी ल्युबचा वापर केला जातो.
आपल्याकडे नेहमीच स्टोअरमधून विकत घेतलेले ल्युब नसते, म्हणून बर्याच वेळा लोक घरात असलेल्या वस्तू ल्युब म्हणून वापरतात. काही लोक नारळ तेल, लाळ, व्हॅसलीन किंवा कोणत्याही लोशनचा वापर ल्युब म्हणून करतात. परंतु या गोष्टींचा आरोग्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो याची कल्पना त्यांना नाही.
अशा घरातील गोष्टी योनीमार्गात वापर करण्यास उपयुक्त नाहीत. या गोष्टींमुळे तुमचा योनिमार्गाचा PH लिव्हर खराब होऊ शकतो. चला पाहूया लाळ, व्हॅसलीन किंवा नारळतेल वापरल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात.
लाळ (Saliva) -
बरेच लोक XXX किंवा पॉर्न चित्रपटांवरून प्रेरित होऊन, ल्यूब म्हणून लाळ वापरतात. काही लोकांना ही गोष्ट उत्तेजित करते. परंतु लाळेच्या वापराने इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो, त्यामुळे सेक्स करताना कधीही ल्युब म्हणून लाळेचा वापर करू नये.
नारळ तेल (Coconut Oil) -
नारळ तेल अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, परंतु सेक्सदरम्यान ल्युब म्हणून त्यांचा वापर करणे योग्य नाही. नारळ तेल योनीच्या स्वतःच्या वातावरणास खराब करू शकते, तसेच वेळेवर साफ न केल्यास संसर्ग देखील होऊ शकतो. (हेही वाचा: Hot Oral Sex Tips: पुरुषांच्या वीर्याची चव सुधारण्यासाठी काही सोपे उपाय; जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)
व्हॅसलीन (Vaseline) -
पेट्रोलियम जेली ही देखील अशी एक चिकट गोष्ट आहे, जी आपण एक ल्युब म्हणून वापरू शकत नाही. नारळ तेलाप्रमाणे ते आपल्या योनीची पीएच पातळी खराब करू शकते.
लोशन (Lotion) -
तज्ञ नेहमीच हा सल्ला देतात की, योनीमध्ये कोणतेही सुगंधित उत्पादन वापरू नका. योनीमध्ये वापरण्यास डॉक्टरांनी मनाई केलेल्या गोष्टींमध्ये लोशन देखील आहे. लोशनमध्ये असे अनेक रासायनिक घातक असू शकतात, जे तुमच्या योनीला तसेच लिंगालाही नुकसान पोहचवू शकतात.
सेक्स दरम्यान वेदना आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी, नेहमी दुकानातून खरेदी केलेला ल्युब हा अतिशय चांगला आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. बरेच लोक कोरफड जेल किंवा इतर गोष्टींचा वापर करतात. परंतु आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही उत्पादने वापरू नये.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )