Sex Myths: पुरुषाचे लिंग ते स्त्रीचे योनीपटल, आदीपर्यंत समाजात संभोगाबद्दल आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या वास्तवदर्शी काही मुद्दे
स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनात सेक्सला विशेष स्थान असते. असे असूनही सेक्स संबंधित अनेक प्रश्न तरूणांच्या मनात आहेत, ज्याविषयी ते कोणाशीही उघडपणे बोलू शकत नाहीत.
जोडप्यांमधील नातेसंबंध दृढ करण्यासाठी सेक्स (Sex) फार महत्वाची भूमिका बजावतो. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनात सेक्सला विशेष स्थान असते. असे असूनही सेक्स संबंधित अनेक प्रश्न तरूणांच्या मनात आहेत, ज्याविषयी ते कोणाशीही उघडपणे बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत इंटरनेटवर सेक्ससंबंधित या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळू लागतात. जरी इंटरनेटवर प्रत्येक विषयाची माहिती सहजपणे उपलब्ध असली, तरी सेक्सबाबत अशा काही गोष्टी आहेत ज्याबद्दल समाजामध्ये चुकीचा गैरसमज पसरला आहे.
सेक्सबाबत ज्या गोष्टी पूर्वीपासून लोक सांगत आले आहेत, त्याच गोष्टी पुढे जात आहेत. मात्र यामुळे तरुणाईच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून त्यांच्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. विशेषत: लैंगिक गोष्टी संबंधात अनेक गैरसमज आहेत ज्याचे निराकरण करणे गरजेचे आहे.
गैरसमज - पुरुषाचे जननेंद्रियाचा आकार जितका मोठा, तितका सेक्सचा अनुभव चांगला.
सत्य- बर्याच लोकांमध्ये, सेक्सबद्दलची सर्वात सामान्य धारणा अशी आहे की, एखाद्या पुरुषाचे लिंग जितके मोठे असेल तितकेच चांगले लैंगिक सुख मिळेल. मात्र लक्षात घ्या लैंगिक सुख मिळवण्यासाठी पुरुषाच्या लिंगाचा आकार महत्वाचा नाही, तर दोघांमधील केमिस्ट्री महत्वाची आहे. उत्तम सेक्सचा अनुभव घेण्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियांचा सरासरी आकार देखील पुरेसा आहे.
गैरसमज - महिलांच्या प्रायव्हेट पार्टवर केस असू नयेत.
सत्य- बर्याच लोकांना असे वाटते की, महिलांच्या प्रायव्हेट पार्टसवर असलेल्या केसांमुळे सेक्स चांगला एन्जोय करता येत नाही. अनेक पुरुषांना असे वाटते की, स्त्रियांचा प्रायव्हेट पार्ट केसविरहीत असावा. मात्र अशा केसांमुळे सेक्समध्ये कोणतीही अडचण येत नाही. किंबहुना अनेक जोडप्यांना एकमेकांच्या प्रायव्हेट पार्टसवर असलेले केस उत्तेजित करतात.
गैरसमज - पहिल्या सेक्सचा अनुभव वेदनादायक असतो.
सत्य- सेक्स दरम्यान प्रत्येक वेळी त्रास होत नाही, परंतु जेव्हा आपण पहिल्यांदा एखाद्याशी सेक्स करत असाल तेव्हा कदाचित हा अनुभव थोडा त्रासदायक ठरू शकतो. मात्र जर का सेक्स करताना आपण ल्युब्रिकेशन वापरले तर हा त्रास नक्कीच कमी होतो. मात्र यासाठी सेक्स करताना पुरेसा फोरप्ले करणे गरजेचे आहे, यामुळे स्त्रिया लवकर उत्तेजित होतात आणि कदाचित त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. (हेही वाचा: Oral Sex Tips: जाणून घ्या ओरल सेक्ससाठी का तयार होत नाहीत स्त्रिया; मुखमैथुन पूर्णतः एंजॉय करण्यासाठी घ्या 'या' गोष्टींची काळजी)
गैरसमज - पहिल्यांदा सेक्स करताना स्त्रियांचा हायमन तुटतो
सत्य- पुष्कळ लोकांचा असा समज आहे की, स्त्री जेव्हा पहिल्यांदा सेक्स करते तेव्हा तिचा योनीचा पडदा फाटतो. मात्र पुरुषाच्या लिंगामुळेच स्त्रियांच्या योनीचा पडदा फाटतो असे समजणे चुकीचे आहे. कारण कधीकधी खेळ, नृत्य, सायकलिंग किंवा इतर शारीरिक क्रियांमुळेदेखील स्त्रियांच्या योनीचा पडदा फाटू शकतो.
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)