Love Across Borders: नवरा सोडला, देशही बदलला; नेपाळी महिलेला बिहारी आवडला, त्याने 'केसाने गळा कापला'
त्यासाठी तिने नवरा आणि देशही सोडला. दोघांनी लग्नही केले. पण तिचे दुर्दैव असे की, तो बिहारी आगोदर विवाहीत होता. त्याला पत्नी आणि एक मुलगाही होता.
Nepali Woman Sangita Kumari Leaves Husband: गोष्ट प्रेमाची. प्रेमातील करुण कहाणीची. म्हटलं तर सामान्य.. अगदीच लोकल.. म्हटलं तर असामान्य.. थेट ग्लोबल. होय ही कहाणीच तशी आहे. सीमापार प्रेमाची. पाकिस्तीनी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीना यांच्या प्रेमाला तोडीस तोड ठरावी अशी. पण, त्यांच्या इतके ग्लॅमर न मिळता भलत्याच कारणामुळे चर्चेत असलेली. होय, संगिता कुमारी. एक नेपाळी महिला. वय वर्षे 29. दुसऱ्या बाजूला गोविंद कुमार. बिहारी पुरुष. वय वर्षे 32. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? होय, विशेष आहे. ते त्यांच्या लग्नात. नवरा-बायको म्हणून राहण्यात आणि थाटलेल्या संसारातून गोविंद कुमार याच्या अचानक गायब होण्यात. काय घडलं नेमकं? घ्या जाणून.
भारत आणि नेपाळ या दोन्ही देशाच्या सीमेवर असलेले रक्सौल हे गाव. मूळचा बिहार राज्यातील दरभंगा येथील रहिवासी असलेला गोविंद कुमार एका खासगी बँकेत नोकरीच्या निमित्ताने या गावात आला. गावात त्याचे तसे कोणीच नव्हते. दरम्यानच्या काळात त्याती ओळख येथील संगीता कुमारी हिच्यासोबत झाली. ती मुळची नेपाळमधील. पण सीमा जवळ असल्याने दोन्ही देशांतील स्थानिक लोकांचे एकमेकांना भेटणे होते. त्यातूनच गोविंद कुमार यांची संगिता कुमारी हिच्याशी ओळख झाली. त्यातून जवळीक वाढली. प्रेमांकूर फुलला. त्यातून त्यांनी लग्नाचा घाट घातला. दोघांनी एका मंदिरात लग्नही केले. त्याचे फोटोही काढले.
खरे तर संगिता कुमारी ही विवाहीत. पाकिस्तानमध्ये तिचा विवाह झाला होता. तिचा पती आजारी होता. तरीही गोविंदच्या प्रेमात पडल्याने तिने पती आणिदोन मुलांना सोडून नव्याने विवाह केला आणि रक्सौलमध्ये दोघे राहू लागले. दिवस जात राहिले. अचानक एके दिवशी गोविंद घरातून गायब झाला. प्रदीर्घ काळ वाट पाहूनही तो परतला नाही. त्यामुळे तिने घरातील कागदपत्रांचा शोध घेतला आणि त्याचा मूळ पत्ता शोधून काढला. ती त्याच्या मूळ पत्त्यावर पोहोचली असता तिला खरा धक्का बसला.
गोविंद कुमार याचा आठ वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. त्याला एक पत्नी आणि तिच्यापासून झालेला एक मुलगाही होता. फक्त नोकरीसाठी तो रक्सौल येथे राहात होता. ही सर्व कहाणी संगिता कुमारी जेव्हा बिहारला पोहोचली तेव्हा कळली. ज्यामुळे तीला जोरदार धक्का बसला. ती आणि गोविंदची पहिली पत्नी प्रेरा या दोघींनाही पतीने विश्वासघात केल्याचे कळले. दोघींनीही तातडीने दरभंगा पोलीस स्टेशन गाठत पतिविरोधात तक्रार दिली. दरम्यान, दोघींनी परस्पर तोडगा काढून प्रकरण मिटवावे असा सल्या त्यांना मिळाल्याचे समजते. पती गोविंद कुमार मात्र फरार आहे.