Sex Tips: आपल्या जोडीदारास सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी त्याच्या 'या' संवेदनशील जागांवर करा हळूवारपणे 'मसाज'

त्या जागांवर हातांनी छान मसाज केल्यास तुमचा पार्टनर सेक्ससाठी उत्तेजित झालाच म्हणून समजा.

Massage Parlour | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

रोजच्या कामांमुळे तसेच मानसिक तणावामुळे तुमचे शरीर पुरते थकून गेलेले असते. अशा वेळी सेक्स (Sex) करण्याची ताकदची नसते. त्यावेळी गरज असते ते शरीराला मसाज देण्याची... मात्र जोडपी या मसाज मधून सेक्स साठी चांगली संधी साधू शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या जोडीदाराच्या शरीरावरील संवेदनशील जागा माहित असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला सेक्ससाठी उत्तेजित करु शकता आणि तुमच्या मसाजमुळे तुमच्या जोडीदाराला तुम्ही त्यांची किती काळजी करता हे देखील समजेल.

मसाजमधून सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या संवेदनशील जागा माहित असणे गरजेचे असते. त्या जागांवर हातांनी छान मसाज केल्यास तुमचा पार्टनर सेक्ससाठी उत्तेजित झालाच म्हणून समजा.

1. छातीवर: पुरुष जोडीदारच्या छातीवर तुम्ही छान मसाज देऊ शकता. तर पुरुषही आपल्या महिला जोडीदाराच्या स्तनांना छान मसाज दिल्यास त्या उत्तेजित करु शकता.

2. मानेच्या मागे: मानेचा आणि गळ्याकडचा भाग खूपच संवेदनशील असतो. त्यामुळे मानेवर छान अॅक्युप्रेशर दिल्यास संवेदना जागृत होतात.हेदेखील वाचा- Safe Masturbation Tips: हस्तमैथुन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते मोठी इजा

3. जांघ्यांच्या मध्ये: जांघ्याच्या मधल्या भागांवर बोटांनी अलगद मसाज दिल्यास पार्टनरला उत्तेजित करण्यास मदत होऊ शकते.

4. नितंबांच्या वर: तुमच्या नितंबाच्या वर (Private Part) जवळ अलगद मसाज केल्यास खूप लवकर तुमचा पार्टनर उत्तेजित होऊ शकतो.

5. हात आणि पायांच्या बोटांमध्ये: हात आणि पायांच्या बोटांमध्ये मसाज दिल्यास तुमच्या सेक्ससाठी भावना आणखी तीव्र होऊ शकतात.

मसाज हा प्रकार शरीराला आराम मिळावा म्हणून जितका चांगला आहे तितकाच तुमची सेक्स लाईफ चांगली आणखी रोमांचक बनविण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्यामध्ये सेक्ससाठी उत्तेजिता निर्माण झाली तर तुम्हाला सेक्स दरम्यान Orgasm चा देखील अनुभव मिळू शकतो.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)