Kinky Sex Ideas: Roleplay पासून ते Spanking, Love Bite पर्यंत 'या' आयडिया तुमच्या सेक्स लाईफ करतील स्पाईस अप, नक्की वाचाच
Image For Representations (Photo Credits: File Image)

सेक्स लाईफ (SeX Life) मध्ये खुश असणारे कपल्स हे इतरांच्या तुलनेत एकमेकांच्या सोबत आणखीन खुश असतात, किंबहुना त्यांच्यातील जवळीक ही अधिक असते असे एक सर्वसाधारण निरीक्षण आहे. यात तथ्य असल्यास उत्तम सेक्स साठी मेहनत घेणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. अनेकदा खूप वर्ष एकमेकांच्या सोबत असलेल्या कपलमध्ये सेक्स हे एक रुटीन बनणे अशी समस्या आढळते. तीच जागा, तीच पोझिशन आणि तेवढीच प्रक्रिया यामुळे अनेकांचे सेक्स लाईफ बोअरिंग झालेले असते. त्यात तुम्हाला नावीन्य आणायचे असल्यास त्यासाठी एक उत्तम मार्ग आपण जाणून घेणार आहोत. Kinky Sex हा यासाठीचा मार्ग आहे. अनेकांच्या अनेक फॅन्टसीज असतात, रोल प्ले (Roleplay) करणे, पार्टनर्शी डर्टी टॉक (Dirty Talk) करणे असे प्रकार सेक्स साठी उत्तेजना देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या पार्टनरची आवड ओळखून खाली दिलेल्यापैकी काही आयडीयाज तुम्हीही ट्राय करून पाहू शकता. Morning Sex: सकाळी उठताच सेक्स करण्याचा विचार करत असाल तर 'या' टिप्स आणि पोझिशन्स नक्की जाणून घ्या!

Kinky Sex साठी आयडीया

Roleplay

तुम्ही आणि तुमचा पार्टनर तुमच्या एखाद्या आवडत्या पात्राप्रमाणे ड्रेस घालून एका वेगळ्या परिस्थितीची कल्पना करून रोलप्ले करू शकता. पॉर्न साईट्सवर या कॅटेगरी मध्ये सर्वाधिक सर्च असतात त्यामुळे याबाबत कदाचित तुमच्या पार्टनरला सुद्धा फॅन्टसी असू शकते, त्यामुळे एकदा बोलून पाहायला हरकत नाही. काही जण तर प्राण्यांसारखे ड्रेस अप करून सुद्धा रोलप्ले करतात.

आरश्यासमोर उभे राहून सेक्स

जेव्हा तुम्ही बेडवर पडून सेक्स करत असाल तेव्हा तुमच्या पार्टनरला थोडं आणखीन उत्तेजित करण्यासाठी त्यांना धरीत ल आरश्यासमोर घेऊन जा, त्यांना तुम्हाला प्रतिबिंबासारखे बघू द्या,यामध्ये एक वेगळं थ्रील आहे. शिवाय उभे राहून करायच्या सेक्स पोझिशन आरश्यासमोर करता येत असल्याने तुम्हाला पोझिशन मध्ये सुद्धा जरा नावीन्य मिळेल.Hot Sex Positions: पूर्ण कपडे न काढता सेक्स करण्यासाठी 'या' पोझिशन आहेत बेस्ट; लॉकडाऊन काळात एकत्र कुटुंबात राहतानाही घेऊ शकाल मजा!

Blindfold Sex

तुमच्या पार्टनरच्या डोळ्यावर पट्टी बांधून सेक्स करण्याचा विचार तुम्हीही कधी केलाय का? जर केला असेल तर त्याचे प्रत्यक्ष अवलंब करून पहा. यात तुम्हाला थोडी उत्सुकता वाढटवण्याची संधी मिळते. याशिवाय हात बेडवर बांधून सुद्धा तुम्ही थोडा प्रयोग करू शकता.

Spank करा

काहींना पार्टनरला Spank करणे हे थ्रिलिंग वाटते. मुळात Spank म्हणजे पार्टनरच्या ब्रेस्ट वर किंवा नितंबावर फटके मारणे. एक लक्षात ठेवा यात उत्साहात येऊन जास्त जोरात मारू नका. यामुळे पार्टनर उत्तेजित होऊन पुढे तुम्हाला एक रफ सेक्स करण्याची सुरुवात होऊ शकते.

पार्टनरला Love Bite द्या

पार्टनरच्या सेन्सेटिव्ह भागांवर अलगद दाताने आणि जिभेने चोखून लव्ह बाईट देणे हे दोघांसाठी सुख असते. मानेवर, ब्रेस्ट वर, पोटावर हे लव्ह बाईट देण्याची मजा आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच अनुभवलेत तर उत्तम.

दरम्यान, सेक्स पोझिशन मध्ये नेहमी प्रयोग करत राहा. गोल्डन रुल सांगायचा झाल्यास सलग दोन दिवस एकच पोझिशन ठेवणे टाळा. पार्टनर्शी बोलायला वेळ द्या. त्यांच्या आणखीन आयडीयाज असतील तर जाणून घ्या, प्रयोग करून पहा. सेक्स ही दोन जणांना जवळ आणणारी बाब आहे त्याची पूर्ण मजा घ्या.