तरुणींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांची मुलांबाबतची आवड, वाचा सविस्तर
Image For Representation (Photo: Facebook)

झोप (Sleep) हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. मुलींनाही झोपणं हा आवडीचा विषय आहे. सर्वसामान्यांप्रमाणे मुलींच्याही झोपेच्या अनेक त-हा असतात. तुम्ही जर याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. ही झोपण्याची पद्धतच त्या मुलींना कशा प्रकारची मुलं आवडतात हे ठरते. ऐकून धक्का बसला ना हो पण हे खरे आहे. सध्याच्या काळात मुलांपेक्षा मुलींच्या अपेक्षाच वाढत चालल्या आहेत. अशात जर मुलीच्या मुलाकडून काय अपेक्षा असतात हे जर कळलं तर अजून काय पाहिजे. आज आम्ही आपली अडचण थोडी सोपी करणार आहोत आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की मुलीला कोणत्या प्रकारची मुले आवडतात हे आपण मुलीच्या झोपण्याच्या स्थितीतून कसे शोधू शकता.

पाहूया मुलींच्या झोपण्याच्या काही पद्धती असतात. हे प्रकार आणि त्यावरुन त्यांना मुलांबाबतची आवड कसे ओळखाल

1. पोटावर उलटया झोपणाऱ्या मुली- उलटी झोपलेल्या किंवा पोटवर झोपलेल्या मुली खूपच बेफिकीर असतात. त्यामुळे त्यांना जास्त मनोरंजन करणारी मुले आवडतात.

2. सरळ झोप घेणाऱ्या मुली- हात न वळवता सरळ हातांनी झोपी गेलेल्या मुली अतिशय संतुलित स्वभावाच्या असतात ती मुलगी मोठी स्वप्ने पाहण्यावर विश्वास ठेवते तिला तिच्या आयुष्यात बरेच काही साध्य करायचे असते अशा मुली डोमिनेटेड असलेल्या मुलांकडे अधिक आकर्षित होतात.

3. डाव्या कुशीला झोपणाऱ्या मुली- तज्ञांच्या मते डाव्या बाजच्या कुशीला झोपणे हे सर्वात चांगले आहे अशा झोपेमुळे चांगली झोप येते आणि स्वप्न पडत नाही ज्या मुली अशा प्रकारे झोपतात त्यांना संभाषणाच्या बाबतीत तज्ञ मानले जाते त्याला नेतृत्व दर्जाची मुलं आवडतात.

हेदेखील वाचा- New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी

4. पाय पसरवून झोपणाऱ्या मुली- ज्या मुली पाय पसरवून झोपतात त्या बेफाम असतात त्याच्या स्वातंत्र्यामध्ये रोखणारे कोणी आवडत नाही रोख टोक करणारी मुले त्यांना अजिबात आवडत नाहीत त्यांना आनंदी मुले आवडतात.

5. उशावर हात ठेवून झोपणाऱ्या मुली- उशीवर हात ठेवून उजव्या किंवा डाव्या बाजूला झोपायची सवय असलेल्या मुली मुलाच्या देखाव्याकडे जास्त लक्ष देत नाहीत अशा मुली खूप साध्या असतात कोणीही त्यांच्या शब्दात त्यांना सहजपणे गुंतवू शकतात.

हे थोडे हास्यास्पद वाटले असले तरीही एकदा ट्राय करुन पाहायला काही हरकत नाही.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. )