Corona Vaccination नसेल तर 70% तरुणाईचा Dating करण्यास नकार- सर्वे
31 किंवा त्याहून अधिक वर्षे वयाच्या लोकांमध्ये प्रत्येकी 10 पैकी 8 लोकांना असे वाटते की डेटींगवर जाण्यासाठी कोरोना लसीकरण ही एक मुख्य अट आहे.
भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाची दुसरी आणि अत्यंत भायावह लाट सुरु आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown ) सुरु आहे. अशा वेळी सर्वच घटकांची अडचण झाली आहे. यात प्रेमी युगुलांचीही मोठी गोची झाली आहे. त्यांच्या हिंडण्या, फिरण्या आणि भेटण्यावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन डेटिंग क्वैकक्वैक (Online Dating QuackQuack) ने एक सर्वे केला. या सर्वेमध्ये पुढे आलेली गोष्ट अशी की, कोरोना लस (Corona Vaccine) घेतलेल्या जोडीदारासोबत डेट (Dating In Lockdown) करायला त्यांचे पार्टनर मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत. परंतू, जर जोडीदाराने कोरोना लस घेतली नसेल तर अशा पार्टनरसोबत डेट (Dating In Coronavirus) करण्यास त्यांचे पार्टनर अनुत्सुक आहेत. कोरोना लस घेतली नाही म्हणून डेडींग (Dating) टाळणाऱ्यांमध्ये 70% तरुणाईचा समावेश आहे.
ऑनलाइन डेटिंग क्वैकक्वैकने केलेल्या सर्वेचा हवाला देत आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, 18 ते 30 वर्षे वयोगटातील सुमारे 70% लोकांनी कोरोना लसीकरण न केलेल्या जोडीदारासोबत डेटींगवर जाण्यास अनुत्सुकता दर्शवली किंबहूना नकार दिला. 31 किंवा त्याहून अधिक वर्षे वयाच्या लोकांमध्ये प्रत्येकी 10 पैकी 8 लोकांना असे वाटते की डेटींगवर जाण्यासाठी कोरोना लसीकरण ही एक मुख्य अट आहे. दुसऱ्या बाजूला वय वर्षे 18 ते 30 मध्ये 30% लोक कोरोना लसीकरणाबाबत फारसा विचार करत नाहीत. डेट करताना अधिक सावधानता बाळगावी असे हे लोक सांगतात. (हेही वाचा, धक्कादायक! देशात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले; जोडीदाराला फसवून आठ लाख विवाहित लोक Dating Apps वर)
जवळपास 80% महिला आणि 70% पुरुषांना वाटते की, ते अशा व्यक्तीला डेट करु इच्छितात ज्याने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. जर कोई कोरोना लसीचा डोस घेतला नसेल तर ते समोरच्या व्यक्तीचा डेटचा प्रस्ताव धुडकावून लावू इच्छितात. केवळ 25% पुरुषांना आणि महिलांना वाटते की एंटी-वेक्सीनेटर लोकांना डेटींग करण्याबाबत हरकत नसल्याचे म्हटले आहे.
क्वैकक्वैक चे संस्थापक आणि सीईओ रवि मित्तल यांनी बुधवारी एक वक्तव्य करत म्हटले की, सर्वेक्षणात अशाही काही महत्त्वपूर्ण गोष्टी पुढे आल्या ज्यामळे लोक कोरोना संकटात बेजबाबदारी सहन करु शकत नाहीत. अपवाद वगळता प्रत्येक व्यक्ती प्रोटोकॉलचे जबाबदारी आणि काटेकोरपणे पालन करत आहे. दुसऱ्या लाटेमुळे लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. लोकांचा संवाद आता 'लॉकडाउन', 'कोविड', 'मास्क' 'वैक्सीनेशन', 'सोशल डिस्टन्सींग' यामध्ये बदलले आहे.