Senator Marie Alvarado Gil: महिला सिनेटरकडून पुरुष कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण, Sex Slave बनवून Blow Job देण्यासाठी दबाव; मेरी अल्वाराडो-गिल यांच्या विरोधात खटला दाखल

धक्कादायक म्हणजे त्यांनी माजी चीफ ऑफ स्टाफ, चाड कॉन्डिट (Chad Condit) यांना कथीतरित्या 'सेक्स स्लेव्ह' (Sex Slave) बनवले आणि त्यांना मुखमैथून (Blow Job) करण्यास भाग पाडले, असा आरोप आहे.

Marie Alvarado Gil | (Photo Credit X: instagram)

कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटर मेरी अल्वाराडो-गिल (Senator Marie Alvarado Gil) यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual Harassment) गुन्हा दाखल झाला आहे. आरोप आहे की, मेरी यांनी त्यांच्या माजी चीफ ऑफ स्टाफ, चाड कॉन्डिट (Chad Condit) आणि इतर काही पुरुष कर्मचाऱ्यांचा लैंगिक गुलाम (Sex Slave) म्हणून वापर केला. त्यांच्यासोबत गैरवर्तनही (Sexual Misconduct) केले. आरोप झाल्यानंतर सिनेटरवर खटला चालवला जात आहे. सॅक्रामेंटो काउंटी सुपीरियर कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात दावा केला आहे की, सिनेटर अल्वाराडो-गिल यांनी कॉन्डिट यांना 'सेक्स स्लेव्ह' बनवून लैंगिक जबरदस्ती केली. शिवाय, लैंगिक कृत्य नाकारल्यास नोकरीवरुन गच्छंती करेन, असा दबावही टाकला.

प्रवासादरम्यान Blow Job देण्यासाठी दबाव

खटल्यानुसार, माजी काँग्रेस सदस्य गॅरी कोंडिट यांचा मुलगा कॉन्डिट यांनी आरोप केला की, सिनेटरने 2023 मध्ये "अनियमित, नियंत्रित, लैंगिक वर्चस्व गाजवणारे" वर्तन दाखवले. या खटल्यात असे नमूद केले आहे की, मेरी अल्वाराडो-गिल यांनी प्रवासादरम्यान कोंडिट यांस मुखमैथून (Blow Job) आणि लैंगिक सुखासाठी जबरदस्ती करण्यात आली.  न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अयोग्य वेळी चुकीच्या पद्धतीने लैंगिक कृती करावयास लावल्याने कोंडिट यांना अनेकदा लिंग आणि कमरेचा त्रासही झाला. ज्यामुळे शारीरिक दुखापत उद्भवली. ज्याचा परिणाम त्यांच्या लैगिक आणि शारीरिक क्षमतेवर झाला. (हेही वाचा, Blow Job During Rape: बलात्कार करताना मुखमैथुनासाठी आग्रह; महिलेने शिकवला आयुष्यभराचा धडा, घेतला लिंगाचा कडाडून चावा)

कामाच्या ठिकाणी लैंगिक गैरवर्तन (Workplace Misconduct)

काँडिटचा दावा आहे की, ऑगस्ट 2023 मध्ये सिनेटरच्या सेक्स स्लेव्ह म्हणून दिल्या जाणाऱ्या लैंगिक कृती आदेशास नकार देण्यासाठी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले. त्यावर त्यास, अनुचित वर्तनाचा आरोप करणारे शिस्तभंगाचे पत्र पाठवले गेले. सिनेटर मेरी अल्वाराडो-गिल यांच्या अनेक लैंगिक कृती आणि फॅन्टसी त्रासदायक होत्या. त्याने सांताक्लॉजचा पोशाख घालण्यास नकार दिल्यामुळे त्यांस डिसेंबर 2023 मध्ये नोकरीवरुन काढण्यात आले. त्याला कामावरुन कमी करताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्याचे कारण देण्यात आले. नोकरीच्या बदल्या लैंगिक सुखाची मागणी त्याच्याकडे सातत्याने करण्यात आली. (हेही वाचा, इजिप्तशियन 'Toyboy' Mohamed Ibrahim ने 83 वर्षीय Iris Jones सोबत नातं तोडलं; 'Sex Slave'म्हणून वापरल्याचा आरोप)

सिनेटरची प्रतिक्रिया

सिनेटर अल्वाराडो-गिलचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकिलांनी आशीलावर झालेले आरोप फेटाळून लावले आणि त्यांना "बोगस" आणि "आर्थिकरित्या प्रेरित" असे त्याचे वर्णन केले. तिचे वकील ओग्नियन गॅव्ह्रिलोव्ह म्हणाले, "एका असंतुष्ट माजी कर्मचाऱ्याने पगार मिळविण्यासाठी पुराव्याशिवाय रचलेले एक विचित्र कथानक सादर केले आहे. आम्हाला खात्री आहे की, सिनेटर या आरोपांपासून मुक्त होईल आणि खटलाही जिंकेल.

दरम्यान, सांगितले जात आहे की, सिनेटरवर झालेल्या आरोपांना स्थानिक राजकारणाचीही किनार आहे. सिनेटरचे वर्तन आणि भूमिका त्या सध्या असलेल्या टेमोक्रॅटीक पक्षाशी जूळत नाहीत. परिणामी त्यांनी अलिकडेच रिपब्लिकन पक्षाकडे जाण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. त्यापार्श्वभूमीवरही हा वाद उफाळल्याची चर्चा आहे.