BharatMatrimony Fake Profile: भारत मॅट्रिमनी साईटवर विवाहितेच्या नावे फेक प्रोफाईल; महिलेने सोशल मीडियावर सांगितला धक्कादायक प्रकार

एका विवाहित महिलेचा फोटो तिच्या एलिट सबस्क्रिप्शन सेवेवर बनावट प्रोफाईलमध्ये वापरल्यानंतर भारत मॅट्रिमनीला टीकेचा सामना करावा लागतो. स्वाती मुकुंद या महिलेने इन्स्टाग्रामवर आपल्यासोबत घडलेला किस्सा सामायिक केला. ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल

Swati Mukund | (Photo Credit : Instagram)

Matrimonial Platform Controversy: विवाह जमविण्यासाठी आजकाल अनेक लोक भारत मॅट्रिमनी (BharatMatrimony) ही वेबसाईट वापरतात. या साईटवर असलेली सर्व खाती म्हणजेच प्रोफाईल्स खरी असल्याचा कंपनीचा दावा असतो. असे असले तरी, या साईटवर सुद्धा अनेक प्रोफाईल्स फेक असल्याचे पुढे आले आहे. स्वाती मुकुंद (Swati Mukund) नामक एका विवाहीत महिलेसोबत असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला. या महिलेचा विवाह झाला आहे. मात्र, तिचा फोटो वापरुन मॅट्रिमनी वेवसाईटवर चक्क बनावट प्रोफाईल सुरु असल्याचे निदर्शनास आले. ज्यानंतर या महिलेने संबंधीत वेबसाईटकडे तक्रार केली. तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने सोशल मीडियावरही शेअर केला आहे.

'भारत मॅट्रिमनी स्कॅम'

स्वाती मुकुंद नामक महिलेने इन्स्टाग्राम प्रोफाईलवर पोस्ट लिहीत, तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराचा उल्लेख 'भारत मॅट्रिमनी स्कॅम' असा केला आहे. फेक प्रोफाईल्स वापरणाऱ्यांबद्दल तिने वापरकर्त्यांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. सोशल मीडियावर या महिलेने शेअर केलेल्या आणि आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला अनुभव सामाईक केला आहे. तिच्या खात्याला 2,00,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. मुकुंदने तिचा अनुभव शेअर केला आणि तिचा फोटो परवानगीशिवाय वापरल्याबद्दल धक्का व्यक्त केला. व्हिडिओमध्ये, ती स्पष्ट करते की ती तिच्या पतीला भारतमॅट्रिमनी किंवा इतर कोणत्याही वैवाहिक अॅपवर भेटली नाही. (हेही वाचा, Fraud: वैवाहिक वेबसाइटवर बनावट प्रोफाइलवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक)

सोशल मीडियावर टीका

मुकुंदची पोस्ट व्हायरल होताच मॅट्रीमेनी साईटवर टीकेची झोड उठली आहे. अनेक वापरकर्त्यांनीही साईटवरुन असा प्रकार घडत असल्याचा दावा केलाआहे. काहींनी आपली फसवूक झाली असून पोलिसांकडे तक्रार करा असा सल्ला स्वाती मुकुंद या महिलेला दिला आहे. काहींनी म्हटले आहे की, साईटकडे तक्रार करुन आपले प्रोफाईल हटवा. काही लोक मुद्दाम अशा प्रकारे फोटो शेअर करत असतात आणि फेक प्रोफाईल बनवत असतात,असेही काही वापरकर्त्यांचे म्हणने प्रतिक्रियांमध्ये दिसले. (हेही वाचा, Tamil Nadu Crime: चैन्नईमध्ये Matrimonial Site वर बनवले पत्नीचे फेक प्रोफाइल, घटस्फोट हवा असल्याने पतीचे कृत्य)

महिलेकडून सोशल मीडियावर पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Swati Mukund (@swatimukund)

काय आहे भारत मॅट्रिमोनी?

दरम्यान, BharatMatrimony ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह वैवाहिक वेबसाइट मानली जाते. याची स्थापना आनंद भूषण यांनी 1997 मध्ये केली होती आणि ती Matrimony.com समूहाचा भाग आहे. प्लॅटफॉर्म लाखो भारतीयांना मॅचमेकिंग1 साठी सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा प्रदान करून त्यांचे जीवन भागीदार शोधण्यात मदत करते, असा कंपनीचा दावा आहे. कंपनी असाही दावा करते की,सर्व प्रोफाइल 100% मोबाइल-सत्यापित क्रमांकांसह सत्यापित आहेत. वापरकर्ते छंद, स्वारस्ये, स्थान आणि बरेच काही यासारख्या विविध फिल्टरवर आधारित संभाव्य जुळण्या शोधू शकतात. प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना संभाव्य जुळण्यांशी कनेक्ट करण्यात मदत करण्यासाठी व्हॉईस कॉल, संदेशन आणि व्हिडिओ कॉल सारखी वैशिष्ट्ये ऑफर करते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now