53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य
हा असा संवेदनशील मुद्दा आहे, ज्याबद्दल उघडपणे बोलले जात नाही. मात्र काळाच्या ओघात लोकांची विचारसरणीही बदलत आहे
भारतात अजूनही लैंगिक (Sex) विषयावर बोलणे किंवा शारीरिक संबंधावर चर्चा करण्यास संकोच आहे. हा असा संवेदनशील मुद्दा आहे, ज्याबद्दल उघडपणे बोलले जात नाही. मात्र काळाच्या ओघात लोकांची विचारसरणीही बदलत आहे. लोक आता सेक्स या गोष्टीला त्यांची गरज म्हणून स्वीकारत आहेत. अलीकडील काही सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, लोक आपल्या सेक्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लग्नानंतरही विश्वासघात करण्यास धजावत नाहीत.
याबाबत ग्लोबल एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप, ग्लेडेनच्या (Gleeden) सर्वेक्षणात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या संशोधनानुसार, 43 टक्के पुरुषांच्या तुलनेत 53 टक्के भारतीय विवाहित महिलांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी लग्नानंतरी इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत.
याबाबत ग्लेडेनचे मार्केटिंग संचालक म्हणाले- 'भारतीय स्त्रिया आता व्यभिचाराबद्दल खुल्या विचारांच्या झाल्या आहेत. खासकरून जेव्हा यात रोमान्सचा सहभाग असतो.' हे ऑनलाइन सर्वेक्षण दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांतील 1500 लोकांद्वारे केले आहे. या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, विवाहित भारतीय महिला या विवाहित पुरुषांपेक्षा विवाहबाह्य संबंध अधिक ठेवतात. या अभ्यासानुसार, 26 टक्के पुरुषांच्या तुलनेत 40 टक्के विवाहित स्त्रिया इतर पुरुषांशी नियमित शारीरिक संबंध ठेवतात.
भारतातील जवळजवळ 50 टक्के विवाहित लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांनी आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. 48 टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की, एकाच वेळी दोन लोकांवर प्रेम केले जाऊ शकते. त्याच वेळी, 46 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, एखाद्याशी प्रेमसंबंध असतानाही व्यभिचार केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की बहुतेक भारतीय लोक आपल्या जोडीदाराच्या बाहेरच्या अफेयरबद्दल समजल्यावरही त्याला माफ करतात.
(हेही वाचा: पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध)
याबाबत 37 टक्के लोकांनी सांगितले आहे की, आपल्या जोडीदाराच्या व्यभिचाराबद्दल समजल्यावरही कोणताही विचार न करता ते आपल्या पार्टनरला माफ करू शकतात आणि त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा ठेवतात. दुसरीकडे त्याच वेळी, 40 टक्के लोकांनी सांगितले आहे की, फसवणूक केल्याबद्दल क्षमा करणे हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते.