आजचे राशीभविष्य: 9 फेब्रुवारी 2019 जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी?
9 फेब्रुवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
9 फेब्रुवारी 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या, शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष: मेष आजचा दिवस तुम्हाला शुभदायी असणार आहे. मानसिक आणि प्राकृतिक स्वास्थ उत्तम राहिल. थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी राहिलेली कामे पूर्ण करा. घरातील मंडळींची साथ लाभेल.
शुभ उपाय- विचारपूर्वक वागा.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पिवळा
वृषभ: राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामात चुका होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीसह वेळ घालवल्यास ताणतणावापासून दूर राहिल्यासारखे वाटेल. घरातील मंडळींचे सहकार्य मोलाचे ठरेल.
शुभ उपाय- वेळेनुसार कामे पूर्ण करा.
शुभ दान- गाईला चारा द्या.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पांढरा
मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी आज कोणतेही नवीन काम करण्यास सुरुवात करु नका. त्या कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या. वाद घालणे टाळा.
शुभ उपाय- गुळ खाऊन बाहेर जा.
शुभ दान- मंदिर उभारणीच्या ठिकाणी मदत करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- जांभळा
कर्क: आजच्या दिवशी कर्क राशीतील व्यक्तींनी जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांचा आदर करा. प्रिय व्यक्तीशी प्रेमाने वागा. आई-वडिलांच्या आशिर्वादाने नवीन काम करण्यास उत्तम दिवस आहे.
.
शुभ उपाय- लक्ष्मीच्या मंत्राचे जाप करा.
शुभ दान- गरीबाला जेवण द्या.
शुभ अंक- 4
शुभ रंग- हिरवा
सिंह: सिंह राशीतील व्यक्तींनी चिडचिड होण्यापासून दूर रहा. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण राहिल. घरातील मंडळींचा साथ लाभेल. मित्रपरिवारासह बाहेर जा.
शुभ उपाय- दह्याचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- गुलाबी
कन्या: कन्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नोकरीच्या ठिकाणी कन्या राशीतील व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मंडळींचा आदर करा. प्रिय व्यक्तीस वेळ द्या.
शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर जा.
शुभ दान- गरजूंना उपयोगी वस्तू दान करा.
शुभ अंक-1
शुभ रंग- सोनेरी
तुळ: तुळ राशीतील व्यक्तींना आज दुसऱ्यांची मने जिंकल्याचा अनुभव येईल. कामाचे तुमच्या कौतुक केले जाईल. मित्रमंडळींची गाठभेट होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ उपाय- नामस्मरण करा.
शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- गुलाबी
वृश्चिक: आजच्या दिवशी जुन्या मित्रमंडळींशी गाठभेट होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आदर मिळेल. पैसे खर्च कराल पण नंतर त्यावर जास्त विचार करु नका. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.
शुभ उपाय- काळा रंगाचे वस्र परिधान करु नका.
शुभ दान- नारळ समुद्रात अर्पण करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- केशरी
धनु: या राशीतील व्यक्तींनी आज वहान संभाळून चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पैसे जास्त खर्च करण्यापासून दूर रहा. घरातील मंडळींसाठी वेळ द्या. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.
शुभ उपाय- केशरयुक्त दुधाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- अंथरुण दान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- पोपटी
मकर: मकर राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस ताणतणावात जाईल. घरातील मंडळींशी वाद घालू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रिय व्यक्तीकडून चुक झाल्यास ती समजून घ्या.
शुभ उपाय- गणपती स्तोत्र वाचा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- केशरी
कुंभ: राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस धावपळ करण्यामध्ये जाणार आहे. परंतु प्रवास करताना काळजीपूर्वक करा. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. घरातील मंडळींकडून आनंदाची बातमी कळेल. लग्नासंबंधित गोष्टीतून आनंदाचे वातावरण घरात तयार होईल.
शुभ उपाय- गाईला चारा घाला.
शुभ दान- गरजूंना वस्त्रदान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- करडा
मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींनी आळसपणा सोडून राहिलेली कामे पूर्ण करा. नोकरच्या ठिकाणी कामात चुका करणे टाळा. प्रिय व्यक्तीसह प्रेमाने वागा. घरातील ताणतणापासून दूर रहा.
शुभ उपाय- गुळ खाऊन बाहेर जा.
शुभ दान- ब्राम्हणाला वस्त्रदान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- क्रिम कलर
(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2019 12:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

