राशीभविष्य 23 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

23 सप्टेंबर 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

राशीभविष्य 23 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Zodiac (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

23 सप्टेंबर 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष:  तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

वृषभ: जुने संबंध मजबूत करण्यात यश मिळेल. कोणतं महत्वाचं काम हातात घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे काही महत्वाच्या जबाबदाऱ्यापण आहेत.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा

मिथुन: महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळ

कर्क: नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह: तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कन्या: स्वतःवर असलेलं नियंत्रण आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

तुळ: आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. महत्वाकांक्षेत वाढ होईल.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक: दिवसभर व्यस्त राहाल. कामकाजासोबत जबाबदाऱ्या वाढतील. व्यापारात समजदारीने निर्णय घ्या.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

धनु:  आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- क्रिम कलर

मकर: अचानक धन लाभ होवू शकतो. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. मित्र परिवार तुमची मदत करेल.

शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

कुंभ:  नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

मीन:  दिवस चांगला आहे. जुन्या अडचणी मार्गी लागतील. समाज आणि कुटुंब दोन्ही क्षेत्रातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2020 10:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).