New Year 2020: नव्या वर्षात पहा कधी आहे गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दसरा, दिवाळी? पहा प्रमुख सणांची संपूर्ण यादी
भारतात अनेकसण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यात गुडीपाडवा (Gudi Padwa), गणशोत्सव (Ganesh Utsav) , दसरा (Dussehra) आणि दिवाळी (Diwali) अशा सणांना अधिक महत्व दिले जाते. तसेच या सणांच्या निमित्ताने अनेकजण बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. परंतु, सुट्ट्यांची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडून जाते.
भारतात अनेकसण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यात गुडीपाडवा (Gudi Padwa), गणशोत्सव (Ganesh Utsav) , दसरा (Dussehra) आणि दिवाळी (Diwali) अशा सणांना अधिक महत्व दिले जाते. तसेच या सणांच्या निमित्ताने अनेकजण बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. परंतु, सुट्ट्यांची योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडून जाते. यातच महत्वाचे सण कधी आहेत, याची माहिती असेल तर, तुम्हाला पुढील गोष्टींचा विचार करणे सोपे जाणार आहे. नव्या वर्षात सुट्ट्यांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी खालील माहिती अधिक फायदेशीर ठरणार आहे. Maharashtra Public Holiday 2020 list: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर.
2020 मधील महत्वाच्या सणांची यादी खालील प्रमाणे-
मकरसंक्रात - 14 जानेवारी (मंगळवार)
प्रजासत्ताक दिन - 26 जानेवारी (रविवार)
शिवाजी महाराज जयंती - 19 फेब्रुवारी (बुधवार)
महाशिवरात्र - 21 फेब्रुवारी (शुक्रवार)
होळी -9 मार्च (सोमवार)
गुढीपाडवा - 25 मार्च (बुधवार)
श्रीराम नवमी - 2 एप्रिल (गुरूवार)
हनुमान जयंती - 8 एप्रिल (बुधवार)
गुड फ्रायडे - 10 एप्रिल (शुक्रवार)
अक्षय्य तृतीया - 26 एप्रिल (रविवार)
महाराष्ट्र दिन - 1 मे (शुक्रवार)
बुद्ध पौर्णिमा - 7 मे (गुरूवार)
रमजान ईद - 25 मे (सोमवार)
वटपौर्णिमा - 5 जून (शुक्रवार)
आषाढी एकादशी - 1 जुलै (बुधवार)
गुरू पौर्णिमा - 5 जुलै (रविवार)
रक्षाबंधन - 3 ऑगस्ट (सोमवार)
पतेती/स्वातंत्र्यदिन - 15 ऑगस्ट (शनिवार)
भाद्रपद गणेश चतुर्थी - 22 ऑगस्ट (शनिवार)
अनंत चतुर्दशी - 1 सप्टेंबर (मंगळवार)
घटस्थापना- 17 ऑक्टोबर (शनिवार)
दसरा - 25 ऑक्टोबर (रविवार)
कोजागिरी पौर्णिमा/ईद ए मिलाद - 30 ऑक्टोबर
दिवाळी - 14 नोव्हेंबर (शनिवार)
ख्रिस्मस - 25 डिसेंबर (शुक्रवार)
नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी सध्या देशा-परदेशात मोठी तयारी सुरू आहे. यंदा 31 डिसेंबरला 2019 ला अलविदा म्हणत नववर्षाची सुरूवात करताना मागील कटू आठवणींना अलविदा म्हणत पुन्हा नव्याने सुरूवात करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)