National Raisin Day: नियमित मनुका खाल्याने होतो आरोग्याला फायदा, दूर होतील 'या' समस्या, जाणून घ्या

मनुक्याला देखील एक भला मोठा इतिहास आहे. ३० एप्रिल १९०९ मध्ये युनायडेट स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय मनुका दिवस साजरा केला गेला.

National Raisin Day PC PIXABAY

National Raisin Day: दरवर्षी ३० एप्रिल रोजी राष्ट्रीय मनुका दिवस साजरा केला जातो. मनुक्याला देखील एक भला मोठा इतिहास आहे. ३० एप्रिल १९०९ मध्ये युनायडेट स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय मनुका दिवस साजरा केला गेला. या दिवसी लोकांना नव्या सुकामेवाची ओळख करून दिली. आपल्या आरोग्यासाठी मनुका खूप फायेदशीर ठरतो. त्यामुळे डॉक्टर नेहमी सल्ला देतात की, मनुकांच्या आहारात समावेश करा. नियमित मनुकाचा सेवन केल्याने त्वचा चमकदार आणि तेजस्वी दिसतो. द्राक्षांना सुकवून त्यांपासून मनुका बनवला जातो.

मनुका केवळ स्वादिष्टच नव्हे तर पौष्टिक असतो. अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी युक्त असलेला मनुका शरिरात प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात. जाणून घ्या मनुका खाल्याने तुमच्या शरिरात कोणते कोणते फायदे होतात. (हेही वाचा- आमरस डोसा; सोशल मीडीयात अजून एक विचित्र रेसिपी वायरल (Watch Video)

१. फायबर- अर्धा कप मनुका खाल्याने शरिरात १० ते २० टक्के ऊर्जा मिळू शकते. जर शरिरातील खराब कोलेस्ट्रोल कमी करायचे असतील. तर नियमित अर्धा कप मनुक्यांचे सेवन करा. मनुका फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. एवढं नव्हे तर शरिरातील पाचन शक्ती सुरळीत करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

२. अँटिऑक्सिडंट्स- मनुकामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे तुमच्या शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे शरिरातील अशक्तपणा कमी होतो. छातीत जळजळ होण्यापासून मनुका काम करते. मनुके रक्तदाब संतुलित करण्याचे देखील काम करते.

३.लोह- शरिरात लोहाचे प्रमाण कमी झाल्यात मनुष्याला काम कमी केल्यास थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे शरिरात लोहाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मनुकांचा सेवन करा. मनुका हा लोहाचा उत्तम स्रोत मानला जातो. शरिरात रक्त पेशी कमी असल्याचे मनुक खावा. जेणे करून शरिरात रक्त पेशींची वाढ होईल.