Mukesh Ambani 63rd Birthday: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसा दिवशी जाणून घ्या त्यांची संपत्ती, टोपण नाव ते निवासस्थान Antilia Building बाबत इंटरेस्टींग गोष्टी!

उद्योगपती धीरूबाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांचा मोठा मुलगा मुकेश यांचा जन्म 19 एप्रिल 1957 साली येमेन मध्ये झाला आहे.

Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

Reliance Industries चे चेअरमन आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा आज 63 वा वाढदिवस आहे. उद्योगपती धीरूबाई अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी यांचा मोठा मुलगा मुकेश यांचा जन्म 19 एप्रिल 1957 चा आहे. 31, मार्च पर्यंत मुकेश अंबांनी यांची संपत्ती $48 बिलियन इतकी आहे. दरम्यान फॉर्ब्सच्या बिलेनियर्सच्या यादीमध्ये त्यांचा 17 वा क्रमांक लागतो. भारतामध्ये $88 कोटींची उलाढाल करणार्‍या अंबानींचा ऑईल आणि गॅस इंडस्ट्रीचा व्यवसाय आहे. यासोबतच इतर क्षेत्रामध्येही अंबानींची गुंतवणुक आहे. मग आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतातील या श्रीमंत व्यावसायिकाच्या आयुष्यातील काही खास गोष्टी नक्की जाणून घ्या. Coronavirus उपचारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारले पहिले स्वतंत्र रुग्णालयीन कक्ष; मास्क निर्मिती, अन्न पुरवठा सहित 'या' सुविधा सुद्धा केल्या सुरु.

मुकेश अंबांनींबद्दल खास गोष्टी

मुकेश अंबानी यांची Reliance Industries मध्ये 42% भागीदारी आहे. यासोबत त्यांचा 4 जी व्यवसायामध्ये दबदबा आहे. Reliance Jio मध्ये सुमारे 340 मिलियन ग्राहक आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना व्हॉईस कॉल मोफत आहे. तर डाटा देखील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त मिळतो.