Mens Lifestyle: अशी सुधारा प्रजनन क्षमता, Sperm Count वाढवण्यासाठी करा हे सोपे उपाय

50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी तीस लाख होती

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Facebook)

बरेचवेळा लग्नानंतर अनेक वर्षे  झाली तरी जोडप्यांना मूल होत नाही. अशावेळी गोळ्या. उपचार यांचा आधार घेतला जातो. गर्भधारणेसाठी पुरुष शुक्राणूंची संख्या (Sperm Count) उत्तम असावयास हवी. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. शुक्राणूंची संख्या, त्यांची जलद गती, त्यांची प्रकृती आणि त्यांचे आकारमान हे गर्भधारणेसाठी आवश्यक गुण आहेत. 50 वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या 11 कोटी तीस लाख होती जी आता कमी होऊन मात्र चार कोटी 70 लाख झाली आहे. योग्य तो आहार आणि लाईफस्टाईल यांच्याद्वारे तुम्ही शुक्राणूंची संख्या वाढवू शकता.

हे पदार्थ खा –