या '४' अक्षरांवरुन नाव सुरु होणारे पुरुष पत्नीला राणीसारखे ठेवतात !
कपल (File Photo)

आपल्या साथीदाराने आपल्यावर जीवापाड प्रेम करावे, आपले हट्ट पुरवावे, खूप काळजी घ्यावी, असे प्रत्येक मुलीला वाटत असते. पण प्रत्येकीचीच ही अपेक्षा पूर्ण होतेच असे नाही. तुमच्यापैकी काहीजणींचे पती तुम्हांला अगदी लाडात वागवतात का? तर मग एकदा त्यांच्या नावांचे पहिले अक्षर तपासून पाहा. कारण या अक्षरावरुन नाव सुरु होणारे नवरे बायकोला अगदी लाडात वागवतात. अगदी राणीसारखे ठेवतात, असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. तर पाहुया कोणती आहेत ती अक्षरे....

V

V अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष बायकोसाठी अगदी क्रेझी असतात. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात ते बायकोसाठी उभे राहतात. या अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष दिसायला आकर्षक असण्याबरोबरच खूप चांगले नवरे देखील असतात.

S

S अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष अतिशय जिद्दी असतात. वरवर कठोर वाटणारे हे पुरुष प्रेमाच्या बाबतीत मात्र अतिशय प्रामाणिक असतात. ज्या मुलीवर प्रेम करतील तिची आयुष्यभर साथ देतात. थोडेसे अकडू असल्याने पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करणे त्यांना जमत नाही. पण तिच्या प्रत्येक गरजेची काळजी मात्र अवश्य घेतात.

R

R अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष खूप धीरगंभीर असतात. मात्र पार्टनरला खूश ठेवण्यासाठी अगदी काहीही करण्यास तयार असतात. ते आपल्या पत्नीची इच्छा न बोलताच जाणतात.

A

A अक्षरावरुन नाव सुरु होणारे पुरुष नटखट, मजेशीर असतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त असतो. बायकोचे लाड करण्यात हे पुरुष अगदी माहिर असतात. यांना अनेकदा जोरू का गुलाम म्हटले जात असले तरी हे खरोखरंच उत्तम पती असतात.