Makar Sankranti 2020: मकर संक्रांती निमित्त सुरक्षितपणे पतंगबाजीचा आनंद घेण्यासाठी या टीप्स नक्की लक्षात ठेवा!

अन्यथा मोठ्या अपघातांचा सामना करावा लागू शकतो.

fly kites (Photo Credits: Flickr/Saumil Shah)

Kite Flying Safety Tips: मकर संक्रांतीचा सण म्हणजे स्त्रियांसाठी सुगड पूजन, तिळगुळ वाटणं आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांची रेलचेल घेऊन येणारा नववर्षातला पहिला सण आहे. पुरूषांना आणि मुलांना मकर संक्रांतीचं विशेष आकर्षण असते ते म्हणजे पतंगबाजीचं! गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजीची स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्रातदेखील यंदा छोट्या मोठ्या प्रमाणात पतंगबाजीची स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र पतंग उडवताना लहान मुलांसोबतच मोठया व्यक्तींनादेखील थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या अपघातांचा सामना करावा लागू शकतो. Makar Sankranti 2020 Special: मकर संक्रांती दिवशी पतंगबाजीचा खेळामध्ये बाजी मारायला मदत करतील या खास टीप्स (Watch Video).

अनेकदा डीहायड्रेशनचा त्रास,मांज्यामुळे लहान, मोठ्या जखमा होताता त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. Makar Sankranti 2020: 'मकर संक्रांत' नक्की का साजरी करतात; जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व

मकर संक्रांती दिवशी काय काळजी घ्याल?

मकर संक्रांतीचा सण हा नवचैतन्याचा आहे. त्यामुळे या सणामध्ये रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या. या सणा दिवशी तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं बोलून एकमेकांमधील कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न करा.