Zombie Virus: आर्क्टिकमध्ये 48,500 वर्षांपासून बर्फाखाली दबलेल्या ‘झोम्बी व्हायरस’मुळे येऊ शकते नवी महामारी; तज्ञांनी दिला इशारा
हे व्हायरस परमाफ्रॉस्टमध्ये हजारो वर्षे दबले गेले असूनही, जेव्हा 2014 मध्ये सायबेरियातील क्लेव्हरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्यांचे निरीक्षण केले तेव्हा, या जिवंत विषाणूंनी अमिबा सारख्या एकल-पेशी असलेल्या जीवांना संक्रमित करण्याची त्यांची क्षमता दर्शवली.
Zombie Virus Could Trigger Deadly Pandemic: जगात पुन्हा एकदा नवी महामारी पसरू शकते. कोरोना व्हायरसनंतर आता 'झोम्बी व्हायरस' (Zombie Virus) येण्याची शक्यता आहे. याआधी 2022 मध्ये सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमधून (Permafrost) एक प्राचीन विषाणू सापडला होता. हजारो वर्षे इतक्या कमी तापमानात पडूनही तो सक्रिय होता, म्हणून याला ‘झोम्बी व्हायरस’ असे नाव देण्यात आले. आता शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे की, हा विषाणू अजूनही संसर्ग पसरवू शकतो. आर्क्टिक आणि इतर प्रदेशांमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सुप्त विषाणूंमुळे मानवांसाठी घातक महामारी पसरू शकते याबाबत शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे.
पर्माफ्रॉस्ट हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याखाली कायमचा गोठलेला बर्फाचा थर आहे. आता वितळणारा आर्क्टिक 'परमाफ्रॉस्ट' 'झोम्बी व्हायरस' सोडू शकतो आणि तो संभाव्यत: जागतिक आरोग्य संकटाला कारणीभूत ठरू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. द गार्डियन मधील एका अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानामुळे गोठलेला बर्फ वितळत आहे, ही बाब नव्या महामारीला कारणीभूत ठरू शकते.
या विषाणूंशी संबंधित धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, एका संशोधकाने गेल्या वर्षी रशियातील सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून काढलेल्या नमुन्यांमधून काही ‘झोम्बी व्हायरस’चे पुनरुत्थान केले. त्यानंतर हजारो वर्षांपासून जमिनीखाली असलेले हे विषाणू नवीन रोगाच्या उद्रेकासाठी संभाव्य घटक आहेत, असे ऍक्स-मार्सेली विद्यापीठातील जनुकशास्त्रज्ञ जीन-मिशेल क्लेव्हरी यांनी ठळकपणे सांगितले. क्लेव्हरी यांनी दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये उद्भवणाऱ्या आणि उत्तरेकडे पसरणाऱ्या साथीच्या धोक्यांवर सध्याच्या फोकसबद्दल चिंता व्यक्त केली.
हे असे विषाणू आहेत ज्यात मानवांना संक्रमित करण्याची आणि नवीन रोगाचा उद्रेक करण्याची क्षमता आहे. याशिवाय रॉटरडॅम येथील इरास्मस मेडिकल सेंटरचे शास्त्रज्ञ मेरियन कूपमन्स यांनीही याला सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की पर्माफ्रॉस्टमध्ये कोणते विषाणू अस्तित्वात आहेत हे आम्हाला माहित नाही, परंतु आम्हास वाटते की हा व्हायरस ट्रिगर झाल्यास, पोलिओचा प्रादुर्भाव सारकाही नवी महामारी येण्याची शक्यता आहे.
हे व्हायरस परमाफ्रॉस्टमध्ये हजारो वर्षे दबले गेले असूनही, जेव्हा 2014 मध्ये सायबेरियातील क्लेव्हरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने त्यांचे निरीक्षण केले तेव्हा, या जिवंत विषाणूंनी अमिबा सारख्या एकल-पेशी असलेल्या जीवांना संक्रमित करण्याची त्यांची क्षमता दर्शवली. त्यानंतरच्या वर्षात पुढील तपासण्यांमध्ये विविध सायबेरियन ठिकाणी विषाणूचे स्ट्रेन्स दिसून आले, ज्यांच्यामध्ये आरोग्यदायी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता होती. यातील एक विषाणू नमुना 48,500 वर्षे जुना होता. सध्या तरी या विशानुन्मध्ये मानवांना संक्रमित करण्यास सक्षम नाही, परंतु या ठिकाणी अजूनही असे अनेक विषाणू आहेत जे मानवांवर परिणाम करू शकतात. (हेही वाचा: Cancer Deaths in India: भारतामध्ये एका वर्षात कर्करोगामुळे तब्बल 9.3 लाख मृत्यू, समोर आली 12 लाख नवीन प्रकरणे- Lancet Study)
दरम्यान, शास्त्रज्ञ म्हणतात की, हा धोका ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांमुळे दिसून येत आहे. आर्क्टिक समुद्रातील बर्फ नाहीसा होत आहे. सायबेरियामध्ये शिपिंग, वाहतूक आणि औद्योगिक विकास वाढत आहे. इथे मोठ्या खाणकामांचे नियोजन केले जात आहे आणि तेल आणि धातू काढण्यासाठी खोल पर्माफ्रॉस्टमध्ये मोठे छिद्र पाडले जाणार आहेत. या ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस बाहेर पडण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)