उन्हाळ्यात तंदुरुस्त राहायचयं ? मग दररोज खा 'ही' पाणीदार फळं

मात्र, उन्हामुळे तसेच गर्मीमुळे आपल्याला सतत तहान लागते. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहावे, यासाठी उन्हाळ्यात फळांचे सेवन करणेही आवश्यक असते. उन्हाळ्यात मिळणारी काही फळं तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दुर करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरतं.

Fruits (Photo Credits: Facebook)

उन्हाळ्यात आपण जास्त प्रमाणात पाणी पितो. मात्र, उन्हामुळे तसेच गर्मीमुळे आपल्याला सतत तहान लागते. उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्याला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहावे, यासाठी उन्हाळ्यात फळांचे सेवन करणेही आवश्यक असते. उन्हाळ्यात मिळणारी काही फळं तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दुर करतात. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणं आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरतं.

उन्हाळ्यात थंड वाटण्यासाठी अनेकदा कोल्ड्रिंक्सचे सेवन केले जाते. परंतु, रसायने युक्त असणारी ही कोल्ड्रिक्स तात्पुरती बरी वाटत असली, तरी ती शरीराला त्रासदायक आहेत. त्यापेक्षा नैसर्गिक फळे किंवा त्यांचा रस पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. फळ खाल्ल्याने उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते. आज आपण या लेखातुन उन्हाळ्यात कोणती फळं खावीत याविषयी जाणून घेऊयात... (हेही वाचा - Coronavirus Outbreak: घरगुती Reusable Face Cover, Cloth Mask वापरताना या खास टीप्स नक्की लक्षात ठेवा)

कलिंगड - (Watermelon)

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा मोह होत नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. या फळामध्ये 90% पाणी असते. शरीरातील उष्णता नैसर्गिक पद्धतीने कमी करण्यास कलिंगड खाणं महत्त्वाचं ठरतं. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. याशिवाय कलिंगडाचे सेवन केल्याने पोटातील टॉक्झिक युरिनवाटे बाहेर पडण्यास मदत होते. कलिंगडाचे सेवन केल्याने त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.

खरबूज (Musk melon)

कलिंगडाप्रमाणेचं खरबूजाचं सेवन करणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. खरबूजामध्येही मोठ्याप्रमाणात पाण्याचे प्रमाण असते. खरबूजाची चव कलिंगडापेक्षा फारच वेगळी असते. याचा गर पिवळ्या रंगाचा असतो. उन्हाळ्यात खरबूजाचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच त्वचेचे आरोग्य चांगले राहते. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी खरबूजाचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.

द्राक्षे (Grapes)

उन्हाळ्यात मिळणारे आंबट गोड फळं म्हणजे द्राक्ष. द्राक्षांमध्ये पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. या फळामध्येदेखील मोठ्या प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ह्रदयविकारांसारख्या समस्यांवर आराम मिळतो. याशिवाय मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचं काम द्राक्ष करतात.

ताडगोळा (Ice Apple)

उन्हाळ्यात ताडगोळ्याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. ताडगोळ्यातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी असतं. याशिवाय यात पोटॅशिअमचे प्रमाण जास्त  असते. त्यामुळे शरीरातील टॉक्झिक बाहेर पडण्यास मदत होते. या फळाचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

जाम (Water Apple)

उन्हाळ्यात मिळणार आणखी एक पाणीदार फळ म्हणजे जाम. या फळाचा आकार लहान असला तरी त्यात भरपूर पाणी असते. बाजारात फिक्कट हिरव्या रंगाची फळे मिळतात. तसेच अनेक ठिकणी यांचा रंग गुलाबी असतो. या फळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. या फळाची कोशिंबीरही चांगली लागते.