IPL Auction 2025 Live

World's Most Powerful MRI Scanner: जगातील सर्वात शक्तिशाली एमआरआय स्कॅन मशीनमधून घेतला मानवी मेंदूचा पहिला स्पष्ट फोटो; अवघ्या 4 मिनिटांत पार पडली संपूर्ण प्रक्रिया

या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ अलेक्झांड्रे विग्नॉड यांनी सांगितले की, आम्ही सीईएमध्ये अचूकतेची पातळी पाहिली आहे जी यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही.

World's Most Powerful MRI Scanner

World's Most Powerful MRI Scanner: कधी कधी गंभीर आणि अंतर्गत शारिरीक समस्या उद्भवते तेव्हा डॉक्टर रुग्णाला एमआरआय (Magnetic Resonance Imaging- MRI) चाचणी करायला सांगतात. यामध्ये शरीराच्या आत काय चालले आहे याची तपासणी केली जाते आणि त्यानंतर रुग्णाला योग्य उपचार दिले जातात. एमआरआयचे वैद्यक क्षेत्रात खूप महत्त्व आहे, जे रुग्णाला योग्य उपचार देण्यासाठी खूप उपयुक्त आहे. आता जगातील सर्वात शक्तिशाली एमआरआय स्कॅनरने मानवी मेंदूच्या अति-स्पष्ट प्रतिमा कॅप्चर केल्या आहेत, ज्यामुळे अचूकतेची नवीन पातळी प्राप्त करणे शक्य होणार आहे.

हे फोटो समोर आल्याने मेंदूतील गुपिते आणि आजारांबाबत अधिक माहिती मिळण्याची आशा वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. फ्रान्सच्या अणुऊर्जा आयोगाच्या (सीईए) संशोधकांनी 2021 मध्ये प्रथम या मशीनचा वापर भोपळे स्कॅन करण्यासाठी केला. तीन वर्षांनंतर आता आरोग्य अधिकाऱ्यांनी माणसांचे स्कॅनिंग आणि मानवी मेंदूचे फोटो काढण्यासाठी या मशीनला ग्रीन सिग्नल दिला आहे.

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत, एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग) मशीनद्वारे सुमारे 20 निरोगी लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ अलेक्झांड्रे विग्नॉड यांनी सांगितले की, आम्ही सीईएमध्ये अचूकतेची पातळी पाहिली आहे जी यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही. स्कॅनरद्वारे तयार केलेले चुंबकीय क्षेत्र 11.7 टेस्ला आहे, हे मोजण्याचे एकक आहे. हे नाव शोधक निकोला टेस्ला यांच्या नावावर ठेवण्यात आले. (हेही वाचा: Rare Human Case of Bird Flu in Texas: अमेरिकेत गायींच्या संपर्कात आल्यानंतर व्यक्तीला झाली बर्ड फ्लूची लागण; जगातील पहिलीच घटना)

या मशीनद्वारे सामान्यत: रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एमआरआयपेक्षा 10 पट अधिक अचूकतेसह प्रतिमा स्कॅन केल्या जातात. रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स सहसा तीन टेस्लापेक्षा जास्त नसतात. यासह या मशिनच्या मदतीने केवळ चार मिनिटांत मेंदूच्या अत्यंत तपशीलवार प्रतिमा प्राप्त होऊ शकतात, ज्यासाठी सध्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या एमआरआय स्कॅनर्सना काही तास लागतात. संशोधकांना आशा आहे की स्कॅनरची शक्ती पार्किन्सन्स किंवा अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांमागील यंत्रणा आणि नैराश्य किंवा स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक स्थितींबद्दल माहिती गोळा करण्यास मदत करेल.