World Pneumonia Day: न्यूमोनिया आजाराची लक्षणे आणि प्रकार, घ्या जाणून
लोकांमध्ये न्यूमोनिया आजाराबाब (Disease) जनजागृहती व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. न्यूमोनिया हा आजार फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे होतो. निमोनिया (Pneumonia) हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो.
जगभरात प्रत्येक वर्षी 12 नोव्हेंबर हा दिवस जागतिक न्यूमोनिया दिन ( World Pneumonia Day) म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये न्यूमोनिया आजाराबाब (Disease) जनजागृहती व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो. न्यूमोनिया हा आजार फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे होतो. निमोनिया (Pneumonia) हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. हा एक गंभीर आजार आहे. या आजाराचे वेळीच निदान होऊन उपचार झाले नाहीत तर रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. वरवर पाहता न्यूमोनिया हा साधा आजार वाटू शकतो. मात्र, हा आजार इतका हलक्यात घेण्यासारखा नाही. त्यामुळे यावर वेळीच उपचार होणे प्रचंड गरजेचे असते.
न्यूमोनिया आजाराची लक्षणे
- न्यूमोनिया झाल्यास ताप येतो किंवा तशी लक्षणे जाणवतात.
- खोकला हे न्यूमोनिया आजाराचे प्रमुख लक्षण आहे.
- खोकल्यातून बेडका पडतो.
- न्यूमोनिया रुग्ण हा अशक्त आणि थकलेला दिसतो.
- रुग्णाला खोकला, ताप आणि घाम सोबतच थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते.
- रुग्णाला श्वास घेताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे तो वेगाने श्वास घेऊ लागतो. परिणामी घसा कोरडा
- पडून खोकला सुरु होतो.
- प्रचंड डोकेदुखी आणि अस्वस्थताही जाणवते.
(हेही वाचा, Fact Check: न्यूमोनियाची लस कोरोना व्हायरसपासून संरक्षण देते? जाणून घ्या सत्य)
न्यूमोनिया चे प्रकार (Types Of Pneumonia)
1) बॅक्टीरियल न्यूमोनिया (Bacterial Pneumonia)
2) व्हायरल न्यूमोनिया (Viral Pneumonia)
3) माइकोप्लाज्मा न्यूमोनिया (Mycoplasma Pneumonia)
4) एस्पिरेशन न्यूमोनिया (Aspiration Pneumonia)
5) फंगल न्यूमोनिया (Fungal Pneumonia).
न्यूमोनिया या आजारात प्रामुख्याने फुफ्फुसाला सूज (Inflammation Of The Lungs) येते. काही वेळा फुफ्फुसात पाणीही भरले जाते. योग्य वेळीच लक्षणे (Nimoniya Lakshan) पाहून उपचार करणे आवश्यक असते. प्रामुख्याने बॅक्टेरिया (Bacteria), व्हायरस (Virus) किंवा इतरही अनेक कारणांमुळे हा आजार होतो.