खाद्यतेल टाकून Butt Lift करण्याचा प्रयत्न फसला; महिला देतेय मृत्यूशी झुंज

परंतु या सर्जरीचा तिच्यावर इतका भयंकर परिणाम झाला आहे की ती आता जीवनमृत्यृच्या दारात उभी आहे.

butt (Photo credits: Needpix)

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार महिला तंदुरुस्त राहण्यासाठी विविध उपाय केले जातात. तसेच आपली अंगकाठी उत्तम असेल तर आपण अधिक सुंदर दिसतो असे सुद्धा मानले जाते. यासाठी जिम, व्यायाम किंवा योगासारख्या मार्गांचा वापर केला जातो. ऐवढेच नाही या सर्व गोष्टी करण्यासोबत नव्या ट्रेन्डनुसार डाएटचा पर्याय वापरला जातो. याच पार्श्वभुमीवर एका 52 वर्षीय महिलेने तिचे बट लिफ्टिंग (Butt Lift) करण्यासाठी एक अनोखी सर्जरी केली. परंतु या सर्जरीचा तिच्यावर इतका भयंकर परिणाम झाला आहे की ती आता जीवनमृत्यृच्या दारात उभी आहे.

Aleida Garcia Ortez असे महिलेचे नाव असून तिने तिचे बट लिफ्टिंग करण्यासाठी एक सर्जरी केली. या सर्जरीनुसार महिलेने बट लिफ्टसाठी खाद्यतेल वापरले. त्यानुसार हा सर्व प्रकार महिलेने घरीच केला. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मध्य कोलंबियामधील कुंडीनामार्का येथील फुसागागा नगरपालिकेत तिने लिपोसक्शनसह आपल्या घरी बट-लिफ्टची शस्त्रक्रिया केली होती. अलेडा हिने ही बट सर्जरी करण्यासाठी 85 हजार रुपये दिले होते असे युके मिररकडून सांगण्यात आले आहे. मात्र महिलेला बट लिफ्टिंग सर्जरी करणे महागात पडले असून 72 तासानंतर तिच्या बटवर काही लक्षणे दिसून आली. महिलेचा मुलगा फाबियान याने असे म्हटले आहे की, बट लिफ्टिंगसाठी खाद्यतेल वापरल्याने तिच्या शरिरावर त्या सर्जरीचे रिअॅक्शन दिसून आले. तिचे बट लाल रंगाचे, त्वचेवर सर्वत्र जखम आणि त्वचा अतिशय चमकदार झाली होती.(Female Genital Mutation: खतना केल्याचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम, आतापर्यंत 1.4 अब्ज डॉरल खर्च, WHO चा धक्कादायक अहवाल)

रिपोर्टनुसार, शस्त्रक्रिया करणारी महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. महिलेची कोणतीही पार्श्वभूमी तपासणी केली गेली नव्हती. तसेच महिलेची वैद्यकीय पात्रता नेमकी काय आहे हे कोणालाही माहिती नसताना सुद्धा अशी जटिल शस्त्रक्रिया केली. कुटुंबीयांनी या प्रकरणी सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.