Winter Health Tips: थंडीत नाक चोंदण्यावर करा हे '5' घरगुती उपाय
अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे नाक मोकळे करु शकता जेणे करुन तुम्हाला नीट श्वासोच्छवास करता येईल.
वातावरणात बदल झाल्याने अनेकदा आपल्याला नाक चोंदण्याच्या (Nose Choked Up) समस्येला सामोरे जावे लागते. नाक चोंदणे म्हणजे नाकाचे छिद्र बंद झाल्याने श्वासोच्छवास करण्यास किंवा बोलण्यास त्रास होतो. अशा वेळी नाकातून विशेष प्रकारचा आवाज येतो. नाक चोंदल्यास ते मोकळे होण्यास बराच वेळ जातो. अशा वेळी आपली खूप चिडचिड होते. अशा वेळी चोंदलेले नाक मोकळे करण्यासाठी आपण श्वास जोरजोरात शरीरात घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामुळे आपल्या छातीवर अनेकदा ताण पडतो. त्यामुळे डोकं जड होणे, छातीत दुखणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. चोंदलेले नाक मोकळे कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अशा वेळी आपण अनेकदा इन्हेलरचा वापर करतो.
थंडीमुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने अनेकदा रात्री किंवा सकाळी उठल्यावर अनेकांना नाक चोंदण्याचा त्रास जाणवतो. अशा वेळी काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे नाक मोकळे करु शकता जेणे करुन तुम्हाला नीट श्वासोच्छवास करता येईल.
1. लिंबू रस आणि मध
चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून रोज सकाळी प्यावे. यामुळे तुमचे चोंदलेले नाक मोकळे होईल.
2. आले
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्ल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते किंवा आले घालून चहा पिणेही चांगले.
हेदेखील वाचा- Health Tips: काळा चहा पिणे या '6' आजारांवर आहे गुणकारी उपाय"
3. कांदा
कांद्याचे दोन भाग करुन त्याचा वास घेतल्यास नाक मोकळे होते. अथवा कांदा चिरल्याने डोळ्यातून आणि नाकातून पाणी येते. तसेच यामुळे नाकही मोकळे होते.
4. पुदिना
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यानेही नाक मोकळे होते.
5. गरम पाण्याची आंघोळ
नाक चोंदण्याची समस्या असल्यास तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे नाक मोकळे होण्यास मदत होते.
नाक चोंदण्यावर सातत्याने इन्हेलर वापरणेही शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे या घरगुती उपायांनी तुम्ही नाक चोंदण्याच्या समस्येवर त्वरित इलाज करु शकता.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)