Wifi कनेक्शन आणि फोन चार्जिंगमुळे सध्या कामाबाबत तणाव वाढतोय, जाणून घ्या कारण
खासकरुन वर्कलाइफमध्ये (Work Life) तणावाची स्थिती ही एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र हाच तणाव आरोग्याशी संबंधित विविध आजार वाढण्यास मदत करतो. तणावामुळे मधूमेह, लठ्ठपणा, अस्थमा आणि पोटासंबंधित आजार बळावतात.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव हा आयुष्यातील एक भाग बनला आहे. खासकरुन वर्कलाइफमध्ये (Work Life) तणावाची स्थिती ही एक सामान्य समस्या झाली आहे. मात्र हाच तणाव आरोग्याशी संबंधित विविध आजार वाढण्यास मदत करतो. तणावामुळे मधूमेह, लठ्ठपणा, अस्थमा आणि पोटासंबंधित आजार बळावतात. काही अभ्यासातून असे ही समोर आले आहे की, काही ठिकाणी कामाचा तणाव फार अधिक असतो.नुकत्याच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, अन्य विकसित देशाच्या तुलनेत 82 टक्के भारतीय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणावाखाली जगत असतात. या कारणामुळे आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कामकाजासह अन्य गोष्टीसुद्धा यामध्ये सहभागी आहेत.
तणावामागील नेमके कारण काय?
एका खासगी कंपनीद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार मेट्रो शहरात 56 टक्के लोकांचे असे म्हणणे होते की, तणावात असताना नोकरीच्या ठिकाणी जाताना रस्ते अपघातात मृत्यू होऊ शकतो. त्याचसोबत वाढत्या तणावाच्या कारणामध्ये सोशल मीडिया, वर्क लाईफ आणि शेजाऱ्यांसोबत वाद सुद्धा येतात. 68 लोकांचे असे मानणे आहे की, जर वायफाय अचानक बंद झाल्यास संताप व्यक्त केला जातो. दुसऱ्या बाजूला 63 टक्के लोक असे म्हणतात की, त्यांचा फोन चार्जिंग वरुन काढून टाकल्यास त्यांना राग येतो.(सावधान! टॉयलेटमध्ये मोबाइल फोनचा वापर आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, होऊ शकतो 'हा' गंभीर रोग)
त्यामुळे अशा छोट्यामोठ्या कारणांमुळे तणावात अधिक वाढ होते. तर तज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या तणावाची मर्यादा विविध आहे. तणावाचा परिणाम आरोग्यावर भयंकर होतो. तणावामुळे चयापचन स्थितीत सुद्धा बिघाड होतो. त्याचसोबत बऱ्याच वेळेस मूड स्विंग होण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. मात्र जर तुम्हाला तणावापासून दूर रहायचे असल्यास सकाळी चालायला जाणे, मेडिटेशन. प्रवास किंवा योगासने करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते,