COVID-19 चा प्रसार हवेमार्फत होत असल्याची पुष्टी करणारी नवी गाईडलाईन WHO ने केली जारी; अधिक अभ्यासाची गरज असल्याचे तज्ञांचे मत

या नव्या गाईडलाईन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, कोविड-19 चा प्रसार हा हवेमार्फत होतो असे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

Coronavirus (Photo Credits- IANS)

जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organisation) कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रसारासंबंधित नव्या गाईडलाईन्स गुरुवारी (9 जुलै) जारी करण्यात आल्या आहेत.  कोविड-19 (Covid-19) चा प्रसार हा हवेमार्फत होतो असे काही रिपोर्ट्समधून समोर आले असल्याचे या नव्या गाईडलाईन्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काही बंद ठिकाणी उदा. नाईट क्लब्स, ऑफिसेस, रेस्टोरन्ट येथे मोठ्याने बोलणे, गाणे गाणे किंवा आरडाओरडा करणे यामुळे हवेमार्फत कोविड-19 चा प्रसार होण्याची शक्यता असल्याचे WHO ने नव्याने जारी केलेल्या गाईडलाईनमध्ये म्हटले आहे.

गर्दी आणि कमी हवेशीर ठिकाणी हवेतून संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच अशा ठिकाणी कोरोना बाधित व्यक्तींचा इतर व्यक्तींसोबत होणाऱ्या संपर्कामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल याची शक्यता टाळता येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या नव्या गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. अशा घटनांची खोलवर तपासणी करणे आणि त्यातून कोरोनाचा प्रसार याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. (कोरोना व्हायरस संदर्भात अधिक तपासणीकरता WHO ची टीम पुढील आठवड्यात करणार चीन दौरा)

सध्याच्या अभ्यासानुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग हा कोरोना बाधित व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्काद्वारे होऊ शकतो आणि हा व्हायरस नाका-तोंडाद्वारे लोकांच्या शरीरात शिरकाव करु शकतो. कोविड-19 बाधित व्यक्तीच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते. कारण या विषाणूचा संसर्ग नाक-तोंड आणि डोळ्यावाटे होऊ शकतो.

WHO मध्ये कोविड-19 च्या टेक्निकल लीड असलेल्या डॉ. मारिया व्हॅन केरकोव्ह यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा प्रसार हवेद्वारे होत असल्याचे नवे पुरावे समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार हवेमार्फत होतो, ही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे याचे पुरावे गोळा करणे, त्याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif