Winter Health Tips: थंडीत सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर खा 'ही' फळे जी ठेवतील तुम्हाला फिट
मात्र ही फळे कोणती हे माहिती असणे फार गरजेचे आहे.
हिवाळा (Winter) सुरु झाला की कोणती फळे (Fruits) खावीत आणि खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. थंडीमुळे सर्दी, खोकला यासारखे साथीचे आजार जास्त उद्भवतात. हवेत गारवा निर्माण झाल्याने सर्दी, कफ (Cough) लवकर होतो. अशा वेळी डॉक्टर काही फळे टाळण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकांना कोणती फळे खावीत हे माहिती नसल्याने कुठलीही फळे खाल्ल्याने सर्दी होते. थंडीत तुमच्या शरीरात हिट निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही निरोगी राहता. अशा वेळी शरीरात हिट निर्माण करणारी फळे खावीत.
थंडीत गरम गरम फास्ट फूड खाण्यापेक्षा शरीरास आरोग्यवर्धक अशी फळे खावीत. मात्र ही फळे कोणती हे माहिती असणे फार गरजेचे आहे. हेदेखील वाचा- Winter Lips Care Tips: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
1. पपई
पपई मध्ये प्रचंड उष्णता असते. त्यामुळे हे फळ थंडीत खाल्ल्याने शरीरात हिट तयार होण्यास मदत होते. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते.
2. चिकू
चिकूमधून भरपूर ऊर्जा मिळते. चिकूमध्ये व्हिटामिन ए चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे थंडीत हे फळ खाणे फायदेशीर आहे.
3. अननस
अननसामध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीची एलर्जी झाल्यास अननसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
4. अंजीर
अंजीरातील कॅल्शिअम हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी या फळाची खूप मदत होते.
5. मोसंबी
मोसंबीत सर्वाधिक फायबर असते जे शरीराला महत्वाचे असते. मोसंबीने श्वसनाचा त्रास कमी होतं. तसेच सूज कमी करण्यासाठी देखील गुणकारी आहे. हिवाळ्यात संधीवाताची समस्या अनेकदा निर्माण होते. अशा वेळी मोसंबी खाणे फायद्याचे ठरते.
तसे पाहायला गेले कोणत्याही ऋतूत कुठलीही फळे खाल्ली तर त्याचा शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही. मात्र ते खाताना तारतम्य बाळगावे. प्रमाणापेक्षा जास्त फळे खाल्ल्याने शरीरावर त्याचा अपाय होऊ शकतो.