Hydroxychloroquine म्हणजे काय? कोरोना व्हायरस ला लढा देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ज्या औषधाची मागणी करत आहेत त्याविषयी सविस्तर जाणून घ्या

ते औषध नेमकं काय आहे आणि त्याचे इतके महत्व कशासाठी हे आता आपण जाणून घेणार आहोत.

Representational Image (Photo Credit- Facebook)

कोरोना व्हायरसला (Coronavirus)  लढा देण्यासाठी हाइड्रोक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine )  या औषधाची मागणी करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी भारत सरकारला जवळपास कारवाईचा इशारा दिला होता त्यामुळे 15 दिवसांपूर्वी ज्या औषधाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती ते निर्बंध आता शिथिल करून गरज असणाऱ्या देशांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन भारताकडून देण्यात आले आहे. वास्तविक डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांचे संबंध मैत्रीचे असून सुद्धा ज्या औषधासाठी ट्रम्प यांनी मित्राशी कारवाईची भाषा केली ते औषध नेमकं काय आहे आणि त्याचे इतके महत्व कशासाठी हे आता आपण जाणून घेणार आहोत.  (हे ही  वाचा- Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारत सरकारने 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंधे हटवली; कोरोनाशी लढण्यासाठी गरजू देशांना मदत करण्याचे आश्वासन)

Hydroxychloroquine नेमकं आहे काय?

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियाच्या उपचारांसाठी वापरले जाणारे एक जुने आणि स्वस्त औषध आहे. याचा केमिकल फॉर्म्युला हा C18H26ClN3O असा आहे. यामध्ये असणाऱ्या ड्रग्सचे प्रमाण पाहता हे औषध 12 वर्षांच्या खालील किंवा गरोदर महिलांना दिले जात नाही. या सोबतच एजीथ्रोमाइसीन हे औषध दिल्याने कोरोनावरील रुग्णांमध्ये फरक दिसू शकतो का असा अभ्यास केंद्रीय आरोग्य विभागाकडून केला जात आहे. तरीही अद्याप या औषधाचा नेमका परिणाम होत असल्याची अजूनही पुष्टी झालेली नाही, किंबहुना कोरोनावरील कोणतीच अधिकृत लस ही अद्याप बाजारात आलेली नाही मात्र तरीही या औषधाला खूप मागणी आहे. काही तज्ञांच्या मते, मलेरियाच्या विरुद्ध वापरले जाणारे हे औषध कोरोनावर सुद्धा परिणाम दाखवत आहे, मात्र याचे पुरावे अत्यअल्प असल्याने कोणताही ठाम दावा करता येणार नाही.

दरम्यान, भारतात हे औषध अधिक प्रमाणात तयार केले जाते आणि इथूनच अनेक देशांना याची निर्यात सुद्धा होते. मात्र भारतात सुद्धा कोरोनाची चाहूल लागताच या औषधाची गरज पाहता 25 मार्च रोजी भारत सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीवर बंदी लावली होती, या औषधाचा वापर सुरुवातील भारतीयांच्या आरोग्याच्या काळजीत व्हावा असा हेतू या बंदी मागे होता.Coronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी

दुसरीकडे, अमेरिकेवर कोरोनाचे अधिक संकट आहे अमेरिकेत आतापर्यंत अमेरिकेत आतापर्यंत 3 लाख 67 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडा 10 हजार 871 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी भारताने अशी बंदी लावून ठेवू नये असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यानुसार, शनिवारी ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा सुद्धा झाली होती. त्यानुसार आता ही बंदी हटवण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif