Covid-19 Delta Plus Variant: काय आहे कोविड-19 चे नवे डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या सविस्तर
भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत असताना एक नवा वेरिएंट समोर आला आहे. याला दुसऱ्या लाटेतील drivers पैकी एक माला जात आहे.
भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना एक नवा वेरिएंट (Varient) समोर आला आहे. याला दुसऱ्या लाटेतील drivers पैकी एक मानला जात आहे. डेल्टा किंवा B.1.6172 असे या व्हेरिएंटचे नाव आहे. याचे पुढे म्युटेशन होऊन हा डेल्टा प्लस किंवा AY.1 असा झाला आहे. Public Health England (PHE) च्या कोरोना व्हायरस वेरिएंटच्या रिपोर्टनुसार, डेल्टा प्लस वेरिएंट हा 7 जूनपासून भारतातील 6 genomes मध्ये आढळून आला. नवीन K417N mutation म्युटेशन असलेले डेल्टा वेरिएंटचे 63 genomes आातापर्यंत global science initiative GISAID वर आढळून आले होते. तर जाणून घेऊया डेल्टा प्लस वेरिएंटबद्दल सविस्तर...
काय आहे डेल्टा प्लस वेरिएंट?
डेल्टा प्लस किंवा AY.1 हे डेल्टा वेरिंटचे नवे रुप आहे, असे दिल्लीतील सीएसआयआर-जीनोमिक्स आणि इंटीग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूटचे शास्त्रज्ञ Vinod Scaria यांनी सांगितले. SARS-COV-2 च्या स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याचा परिणाम म्हणजे डेल्टा प्लस वेरिएंट. यामुळे कोरोना व्हायरसला मानवी शरीरात शिरकाव करुन संसर्ग करण्यास मदत होते.
कोणकोणत्या देशात डेल्टा प्लस वेरिएंट आढळून आले आहे?
PHE ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लस वेरिएंटचे काही रुग्ण इंग्लंडमध्ये आढळून आले होते. बहुतांश रुग्ण हे नेपाळ, तुर्की, मलेशिया, सिंगापूर येथे आढळून आल्याचे genomic sequencing शास्त्रज्ञ Bani Jolly यांनी सांगितले. outbreak.info ने दिलेल्या माहितीनुसार, भारताशिवाय अमेरिका, कॅनडा, युके, रशिया, जपान, पोर्तुगाल, पोलंड, तुर्की, नेपाळ, स्विर्झलँड येथे देखील काही केसेस आढळून आल्या आहेत. (Novavax निर्मित Covid-19 Vaccine कोरोना व्हायरसच्या वेरिएंट्सवर 90% परिणामकारक)
डेल्टा प्लस वेरिएंटवर Monoclonal Antibody Cocktail Treatment उपयुक्त ठरेल का?
तज्ञांनुसार, Monoclonal Antibody Cocktail Treatment डेल्टा प्लस वेरिएंटवर उपयुक्त ठरत नाही. Casirivimab आणि Imdevimab चे कॉम्बिनेशन असणारी उपचार पद्धती सुरुवातील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वापरण्यात आली होती. अलिकडेच भारताने देखील या उपचारपद्धतीला मान्यता दिली आहे.
डेल्टा प्लस वेरिएंट चिंतेचे कारण?
कोविड-19 च्या डेल्टा प्लस वेरिएंटची भारतीय नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे CSIR-IGIB चे डिरेक्टर अरुण अग्रवाल यांनी सांगितले. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींच्या ब्लड प्लाझ्माची या नवीन वेरिएंट विरुद्ध चाचणी करणे गरजेचे आहे. डेल्टा प्लस वेरिएंट हा Monoclonal Antibody Cocktail विरुद्ध प्रतिकारक असला तरी त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होईलच असे नाही, अशी माहिती पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या Immunologist विनीता बाल यांनी दिली आहे.
या वेरिएंटचे काही महत्त्वाचे गुणधर्म तपासल्यानंतरच याचा प्रसार किती वेगाने होईल, हे ठरवले जाईल. या नवीन वेरिएंटने इंफेक्शन झालेल्या लोकांनी अधिक घाबरण्याचे कारण नाही, असेही बाल यांनी सांगितले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)