Delta+Omicron ने बनलेला नवीन विषाणू Deltacron ची लक्षणे काय आहेत? भारतातही आढळले प्रकरणे; किती धोकादायक आहे हा विषाणू, जाणून घ्या

डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून बनलेल्या डेल्टाक्रॉनने भारतातही दार ठोठावले असून अनेक राज्यांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus in India) च्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर आता कोविड -19 च्या नवीन प्रकाराने दार ठोठावले आहे. हा विषाणू पूर्वीपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना विषाणूचे नवीन प्रकार डेल्टा (Delta) आणि ओमिक्रॉन (Omicron) प्रकारांनी बनलेले असून त्याला डेल्टाक्रॉन (Deltacron) असे नाव देण्यात आले आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून बनलेल्या डेल्टाक्रॉनने भारतातही दार ठोठावले असून अनेक राज्यांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

तज्ञांच्या मते, हा एक सुपर-म्युटंट व्हायरस आहे. ज्याचे वैज्ञानिक नाव BA.1 + B.1.617.2 आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला एक संकरित स्ट्रेन आहे. जो सायप्रसमधील संशोधकांनी गेल्या महिन्यात प्रथम शोधला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी ही प्रयोगशाळेतील तांत्रिक चूक असल्याचे मानले. पण आता ब्रिटनमध्ये प्रकरणे समोर येत आहेत. डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक संकरित प्रकार आहे. (हेही वाचा - Novovax' COVID-19 Vaccine ला भारतात 12-18 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी)

डेल्टाक्रॉनची लक्षणे काय आहेत?

या राज्यात आढळली डेल्टाक्रॉनची प्रकरणे -

तेलंगणा टुडेने उद्धृत केलेल्या मनी कंट्रोलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, भारताच्या कोविड जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) आणि GSAID ने सूचित केले आहे की देशात 568 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, हॉटस्पॉट बनलेल्या कर्नाटकातील 221 प्रकरणांमध्ये डेल्टाक्रॉन प्रकारांचे संकेत मिळाले आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32 आणि तेलंगणात 25 आणि नवी दिल्लीत 20 प्रकरणे तपासात आहेत.

दरम्यान, डेल्टा आणि ओमिक्रॉनचा बनलेला नवीन विषाणू किती धोकादायक आहे याबद्दल अनेक अभ्यास सुरू आहेत. वृत्तानुसार, जानेवारी 2022 मध्ये फ्रान्समध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि पहिला रुग्ण आढळून आला. डब्ल्यूएचओ शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी म्हटले आहे की SARSCov2 चे ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकार एकत्र पसरण्याची शक्यता आहे.