व्यायाम करायला वेळ नाही? मग डान्स करा वजन घटवा! सुडौल बांधा, Sexy Figure कमावण्यासाठी हटके स्टेप्स

आजकालच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेळ मिळत नाही, असे लोक असू शकतात. पण, म्हणून काही व्यायाम करण्याचा विचार सोडून द्यायची काहीच गरज नाही. इथे आम्ही आपल्याला काही डान्स स्टेप्स सूचवत आहोत. ज्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करु शकतात.

Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

Dance Help You Lose Weight: शरीर तंदुरुस्त ठेवायचे आहे. भरदार शरीरयष्टी, सुडौल बांधा कमवायचा आहे. पण, काय करायचे वेळच नाही मिळत. माझ्याकडे जर वेळ असता ना तर, अशी काही सेक्सी फिगर (Sexy Figure) बनवली असती की, अनेकांच्या नजरा वळल्या असत्य. हे किंवा यासारखे अनेक संवाद आपल्या कानावर पडत असतात. अनेकजन असा काहितरी विचारही करतात. आजकालच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेळ मिळत नाही, असे लोक असू शकतात. पण, म्हणून काही व्यायाम करण्याचा विचार सोडून द्यायची काहीच गरज नाही. इथे आम्ही आपल्याला काही डान्स स्टेप्स सूचवत आहोत. ज्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त ठेवण्यास मदत करु शकतात. ज्यात  जुंबा डान्स (Zumba Dance), बेली डन्स (Bailey Dance), हिप हॉप डान्स (Hip-Hop Dance)आदिंचा समावेश आहे.

जुंबा नृत्य (Zumba Dance)

जगभरातील अनेक लोग बॉडी फिटनेससाठी जुंबा नृत्य करत असतात. जुंबा नृत्य (Zumba Dance) हा एक मिश्रनृत्य प्रकार आहे. ज्यात सालसा, रुंबा आणि हिप हॉप डान्स पाहायला मिळतात. या नृत्यप्रकारामुळे शरीर अधिक प्रमाणात आणि वेगवेगळ्या कोणात हालचाल करते. त्यामुळे या नृत्यप्रकाराला कार्डियो वर्कआऊट असेही संबोधले जाते. जुंबा डान्स गाण्याच्या तालावर केला जातो. ज्यात अॅब्डस लेग्ज आणि शरीराच्या इतर अवयवांचा व्यायाम होतो. तरुणाईमध्ये हा डान्स चांगलाच लोकप्रिय आहे. (हेही वाचा, अभिनेत्री, TMC MP नुसरत जहां हिचा फिटनेस फंडा; अर्धा तास योगा, जेवणात मासे, प्रकृती एकदम सडपातळ, घ्या जाणून)

जुंबा डान्स व्हिडिओ

बेली डांस (Bailey Dance)

जर तुम्हाला तुमच्या शरीराच पार्श्वभाग (हिप्स), अॅब्स आदी अवयवांना आकर्षक आकार द्यायचा असेल, कमरेवर आणि कमरेखालील पार्श्वभागावर वाडलेली अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर, त्यासाठई बेली डान्स (Bailey Dance) हा एक चांगला प्रकार आहे. यात शरीराची हालचाल एका लयबद्ध पद्धतीने करावी लागते. कधी ती वेगात असते तर कधी हळूवार. या नृत्यप्रकारात खास करुन कंबर आणि पार्श्वभागावर लक्ष केंद्रीत केले जाते. या भागाच्या हालचालीवर या नृत्यात अधिक भर दिला जातो.

बेली डान्स व्हिडिओ

हिप हॉप डांस स्टाइल (Hip-Hop Dance)

हिप हॉप डान्स हासुद्धा एक व्यायामाच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. या नृत्यप्रकारात हिप हॉप म्युजिकवर परफॉर्म केले जाते. यात पाँपिंग, लॉकिंग इथपासून ते ब्रेकिंग स्टाईल आदी प्रकारच्या स्टेप्स केल्या जातात. हा एक असा नृत्यप्रकार आहे जो, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. या डान्स प्रकारात शरीरातील सर्वाधिक कॅलरी बर्न होते असे म्हणतात. हिप हॉप डान्स खास करुन क्लबमध्ये केला जातो. पण, अधिक सरावानंतर तुम्ही हा डान्स घरीही करु शकता.

हिप हॉप डान्स व्हिडिओ

देशी डांस स्टाइल (Desi style dance)

देसी स्टाईल डान्सही व्यायामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरु शकतो. यात तुम्ही भारतातील विविध संस्कृती, प्रदेश आदी प्रकारानुसार असलेले पारंपरीक नृत्य करु शकता.

देसी स्टाईल डान्स

सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. शरीराला व्यायामाची सवय नसेल तर, साधारण वयाच्या तिशीनंतर स्थूलता वाढू शकते. अलिकडे तर अल्पवयीन मुलांमध्येही स्थुलता वाढलेली पाहायला मिळते. शरीलाला व्यायामाची सवय असेल. नियमीत व्यायाम केला तर शरीर तर तंदुरुस्त राहतेच. पण, मनही प्रसन्न राहते. व्यायम करणाऱ्या मंडळींना हृदयविकार, मानसिक थकवा, मुधुमेह अथवा इतर अजारांपासून असलेला धोका कैक पटींनी कमी होऊ शकतो. व्यायामाने शरीर सुदृढ होते. सृदृढ व्यक्तीस दीर्घायु लाभते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now