Tooth Decay: दात किडणे, झिजणे टाळण्यासाठी Water Fluoridation फायदेशीर- संशोधन

या समस्या कमी करण्यासाठी पाण्याचे प्लोराइडेशन (Water Fluoridation) म्हणजेच पाण्यात फ्लूऑरिन (Fluorine) मिसळणे फायदेशीर ठरु शकते. अभ्यासकांनी नुकतेच एक संशोधन केले.

Tooth Decay | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

अनेक नागरिकांमध्ये दात किडणे (Tooth Decay), झिजणे अशा समस्या आढळतात. या समस्या कमी करण्यासाठी पाण्याचे प्लोराइडेशन (Water Fluoridation) म्हणजेच पाण्यात फ्लूऑरिन (Fluorine) मिसळणे फायदेशीर ठरु शकते. अभ्यासकांनी नुकतेच एक संशोधन केले. या संशोधनात अभ्यासकांना आढळून आले की, दात किडण्याच्या इतर प्रतिबंधात्मक पद्धतींपेक्षा पाण्याच्या फ्लोराइडेशनचा पर्यावरणावर कमी परिणाम होतो. त्यामुळे दंत क्षय कमी करण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो.

संशोधकांचा अभ्यास सांगतो की, आज, जगातील 35% पेक्षा जास्त लोकसंख्येला फ्लोराईडयुक्त पाणी उपलब्ध आहे. हे पाणी नियमीत सेवन करणाऱ्या नागरिकाममध्ये इतरांच्या तुलनेत दात किडणे, झिजणे अशा समस्या कमी आढळतात. दरम्यान, पाण्याच्या फ्लोरायडेशनच्या क्लिनिकल परिणामकारकता आणि खर्च-लाभाच्या विश्लेषणाची आकडेवारी उपलब्ध असताना, सध्या त्याच्या पर्यावरणीय प्रभावाचा कोणताही पुरावा मिळत नसल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. (हेही वाचा, तुमचे पांढरेशुभ्र चमकदार दात या 5 कारणांमुळे होतात खराब)

दरम्यान, या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी, संशोधकांच्या टीमने सर्व तीन प्रतिबंधात्मक कार्यक्रमांमध्ये (टूथब्रशिंग, फ्लोराईड वार्निश प्रोग्राम आणि वॉटर फ्लोराइडेशन) समाविष्ट असलेल्या सर्व वस्तू आणि कृतिंचा एकत्रित प्रवास, वजन आणि प्रमाण यांची काळजीपूर्वक मोजणी करून एक निश्चित मूल्यांकन (LCA)केले. त्यासाठी उपलब्ध डेटा एका विशिष्ट पर्यावरणीय कृतीमध्ये प्रविष्ट केला गेल. तसेच, संशोधकांनी कार्बन फूटप्रिंट, प्रत्येक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे प्रमाण आणि जमिनीचा वापर यासारखे पर्यावरणीय घटक निर्धारित करण्यासाठी इकोइन्व्हेंट डेटाबेसचा वापर केला.

ट्रिनिटी कॉलेजमधील डेंटल पब्लिक हेल्थमधील सहयोगी प्राध्यापक ब्रेट डुआन यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, अभ्यास केलेल्या सर्व श्रेणींमध्ये पाण्याच्या फ्लोरिडेशनचा सर्वात कमी पर्यावरणीय प्रभाव होता आणि इतर सर्व समुदायांच्या तुलनेत दातांचा क्षय, कीड आणि इतर समस्या कमी होत्या. अभ्यासात असेही आढळून आले आहे की पाण्याचे फ्लोरायडेशन गुंतवणुकीवर सर्वोत्तम परतावा देते.

हा अभ्यास दंत क्षय कमी करण्यासाठी, विशेषत: सर्वात असुरक्षित (विकासाच्या दृष्टीने मगास) लोकांमध्ये , पाणी फ्लोरायडेशन कार्यक्रमांच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमात महत्त्वाची कामगिरी बजावू शकते.