Year Ender 2022: यावर्षी 'या' 5 आजारांनी केलं लोकांचं जीवन उद्ध्वस्त; 'या' आजाराच्या कहरामुळे सर्वाधिक मृत्यू

आज आम्ही या आजारांबद्दल सांगत आहोत, ज्या आजारांमुळे लोकांना सर्वात जास्त त्रास झाला.

Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Year Ender 2022: 2022 हे वर्ष चांगल्या-वाईट आठवणी घेऊन जात आहे. काही दिवसांनी नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. नवीन वर्ष 2023 चे स्वागत करण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. मात्र, वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या कहराने झाली. यासोबतच अनेक आजारांनी जनजीवन उद्ध्वस्त केले. यावर्षी असे 5 आजार आहेत, ज्यांनी सर्वाधिक कहर केला आहे. आज आम्ही या आजारांबद्दल सांगत आहोत, ज्या आजारांमुळे लोकांना सर्वात जास्त त्रास झाला. यावर्षी अनेक छोट्या-मोठ्या घटना समोर आल्या. याचा सर्वांवर प्रभाव पाडला. आज आम्ही या वर्षातील 5 सर्वात मोठ्या आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले.

कोविड-19 -

कोविड-19 ने यावर्षीही कहर केला. या आजारामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. लोक अजूनही त्याच्या कहरामुळे घाबरलेले आहेत. मात्र, लस लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम पूर्णपणे कमी झाला आहे. परंतु, त्याच्या कहरामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. कोरोनाने अनेकांचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. लोक त्यांच्या घरात कैद झाले. काहींना नोकरीही गमवावी लागली. (हेही वाचा - Diet tips for Diabetics: मधुमेहींनो! Christmas, New Year Celebrations च्या धामधूमीत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्षात ठेवा 'या' डाएट टीप्स!)

मंकीपॉक्स -

कोरोनानंतर मंकीपॉक्सचा धोका खूप वाढला होता. मंकीपॉक्समुळे अनेकांना खूप त्रास झाला. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. 2022 मध्ये या आजाराचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून आला. जगभरात या आजाराने हजारो लोकांचा मृत्यू झाला.

जपानी एन्सेफलायटीस -

जपानी एन्सेफलायटीसनेही यावर्षी कहर केला. यामुळे अनेक बालकांचा मृत्यूही झाला. जपानी एन्सेफलायटीस हा एक एन्सेफलायटीस आहे जो थेट मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे अनेक मुलांचा मृत्यू झाला. 2017 मध्ये गोरखपूरमध्ये या आजाराने अनेक मुलांचा मृत्यू झाला होता.

टोमॅटो फ्लू -

यावर्षी टोमॅटो फ्लूनेमुळे खूप त्रास सहन करावा लागला. या आजारामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हा विषाणू मुलांवर सर्वाधिक हल्ला करतो. यातून अनेक मुलांचा मृत्यू झाला. या आजारालाचं टोमॅटो फीवर असेही म्हणतात. हा विषाणू केरळमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळून आला. हा एक दुर्मिळ प्रकारचा संसर्ग आहे, जो प्राणघातक ठरू शकतो.

डिजीज X -

यावर्षी डिजीज एक्सनेही कहर केला. या व्हायरसने लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या विषाणूने जागतिक आरोग्य संघटनेलाही घाबरवले आहे. डब्ल्यूएचओच्या मते, डिसीज एक्स विषाणूमुळे भविष्यात कोरोना सारखी महामारी निर्माण होऊ शकते.