Coronavirus Symptoms: कोविड-19 चे 'हे' लक्षणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी ठरू शकतात घातक; जाणून घ्या सविस्तर
डॉक्टरांच्या मते मधुमेहासारख्या दाहक परिस्थितीमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचे कार्य रोखले जाते आणि संक्रमणाचा धोका वाढतो.
Coronavirus Symptoms: देशातील कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा परिणाम वेगाने दिसून येत आहे. तथापि, ज्या लोकांना आधीचं आरोग्य समस्या आहे त्यांना सामान्य लोकांपेक्षा या विषाणूची लागण होण्याची अधिक शक्यता असते. विशेषत: आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आपल्याला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेत मधुमेह रूग्णांना संसर्गाच्या तीव्रतेसह मृत्यूचा धोका जास्त असतो.
रक्तातील ग्लुकोजची पातळी शरीरात इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम करते. जे प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम करते. डॉक्टरांच्या मते, मधुमेह रूग्णांना मूलभूत रक्तवहिन्यासंबंधी समस्या असतात. ज्यामुळे हृदयाची समस्या, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसाच्या आजारांसारख्या समस्यांपासून ग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला कोविड ची लक्षणे सांगणार आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. (वाचा - Mucormycosis Precaution Tips: मधुमेह नियंत्रणात ठेवा, स्टेरॉइड्सचा वापर योग्य प्रमाणात करा, स्वच्छता राखा, स्वयं उपचार करू नका - म्युकरमायकोसिसपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारचा सल्ला)
त्वचेवर पुरळ आणि सूज येणे -
कोविडच्या दुसर्या लाटेमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे आणि एलर्जीसारथे लक्षणं जाणवत आहेत. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असेल तर आपल्याला त्वचेवर पुरळ, कोविड नेल्स आणि टोज होण्याची शक्यता असते. वास्तविक, मधुमेह रूग्ण त्वचेच्या समस्यांसाठी अधिक संवेदनशील असतात. या रुग्णांची कोणतीही जखम बरी होण्यास बराच वेळ लागतो. रक्तातील साखरेमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि कोविडचा संसर्ग झाल्यास शरीरात सूज, लाल ठिपके, फोड येण्याची शक्यता वाढू शकते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोविड च्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोविड न्यूमोनिया
न्यूमोनिया हा आजार कोविड रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांना याचा धोका जास्त असतो. डॉक्टरांच्या मते, टाइप-1 आणि टाइप-2 डायबिटीजग्रस्त लोकांमध्ये याचा धोका समान आहे, म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी कोविडच्या या लक्षणांबद्दल सतर्क असले पाहिजे.
ऑक्सिजनचा अभाव
ऑक्सिजन संपृक्ततेच्या पातळीत होणारी घट कोविड रुग्णांसाठी सर्वात मोठा धोका असू शकतो. तीव्र मधुमेहाची स्थिती रोगप्रतिकारक कार्यास रोखते. कित्येक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, पूर्वी अस्तित्त्वात असलेला मधूमेह किंवा अशक्तपणा असलेल्या रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता आणि संबंधित लक्षणांमुळे ग्रस्त होण्याची शक्यता असते, ज्यात दम लागणे, धाप लागणे, छातीत दुखणे आदी लक्षणांचा समावेश आहे.
ब्लॅक फंगस इंफेक्शन (म्यूकोर्मिकोसिस)
काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे कोविड रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत आहे. बुरशीजन्य संसर्गामुळे सामान्यत: चेहऱ्यावरील विकृती, सूज, डोकेदुखी आणि चिडचिड उद्भवते. मधुमेह ग्रस्त रूग्णांमध्ये याचा सर्वाधिक धोका असू शकतो.
डॉक्टरांच्या मते मधुमेहासारख्या दाहक परिस्थितीमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचे कार्य रोखले जाते आणि संक्रमणाचा धोका वाढतो. विषाणूसारख्या बुरशीच्या प्रजननासाठी उच्च रक्तातील साखरेची पातळी देखील अनुकूल आहे.