'या' शहरात सुरु होत आहे जगातील पहिले Vagina Museum; स्त्रियांच्या Private Parts संदर्भात सर्व माहिती उपलब्ध

या संग्रहालयात स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल सर्व माहिती उपलब्ध असणर आहे. स्रियांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल असणारे गैरसमज दूर करणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश असणार आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

जगात अनेक आणि विविध प्रकारची संग्रहालये (Museum) पाहायला मिळतात. विविध वस्तू, कपडे, शस्त्रे, धातू, पेंटिंग्ज यांचे नजराणे अशा संग्रहालयात ठेवलेले असतात. मात्र लवकरच लंडनमध्ये (London) एक अद्वितीय संग्रहालय उघडणार आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. या संग्रहालयाचे नाव व्हजायना संग्रहालय (Vagina Museum) आहे व हे जगातील असे पहिले संग्रहालय असणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी हे संग्रहालय लोकांना पाहण्यासाठी उघडले जाईल. या संग्रहालयात स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल सर्व माहिती उपलब्ध असणर आहे. स्रियांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल असणारे गैरसमज दूर करणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश असणार आहे.

या संग्रहालयाचे संस्थापक फ्लोरेन्स शेक्टर (Florence Schechter) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे संग्रहालय तयार करण्यासाठी सुमारे 44 लाख रुपये खर्च झाले आहेत. हे पैसे फ्लॉरेन्सने क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून गोळा केले होते. या संग्रहालयाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आहे, त्यामुळे लोकांचा याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. याचे स्वतःचे इन्स्टाग्राम खाते आणि वेबसाइट देखील आहे. याबाबत बोलताना फ्लोरेन्स म्हणते, 'योनी आणि त्य संदर्भातील लोकांमध्ये गैरसमज दूर करण्यासाठी हे संग्रहालय उघडण्यात आले आहे.’ (हेही वाचा: Oral Sex एन्जॉय करताना, स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी अशी घ्या आपल्या प्रायव्हेट पार्टसची काळजी)

संस्थापक फ्लॉरेन्सने सन 2017 मध्ये हे संग्रहालय बांधण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांना समजले की पेनिस बेस (पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टस संबंधी) संग्रहालय (Penis Museum) आईसलँडमध्ये (Iceland) आहे. महत्त्वाचे म्हणजे, आइसलँड मधील संग्रहालयात सर्व प्राण्यांचे प्रायव्हेट पार्टस दाखवण्यात आले आहे. याच धर्तीवर फ्लॉरेन्सने महिलांच्या प्रायव्हेट पार्टस संबंधी संग्रहालय उभे केले.

स्त्रियांच्या शरीराच्या ज्या भागाबद्दल बोलण्यास संकोच वाटतो असा सर्व बाबतील इथे माहिती मिळणार आहे. लोकांना इथे योनीसमवेत स्त्रियांचे विविध रोग आणि स्त्रियांच्या शरीररचनाबद्दल माहिती दिली जाईल. संस्थापकांचा असा विश्वास आहे की यामुळे स्त्री जननेंद्रियांविषयी पसरलेले अनेक गैरसमज दूर होतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif