Suniel Shetty ने लॉन्च केलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी 'Lets Get Happi' अ‍ॅप; 24/7 मिळणार मदत

मानसिक आरोग्य जपण्यासाठी मदत घेताना नागरिकांना अनेकदा आपल्याला जज केलं जाईल याची भीती, न्युनगंड असतो. पण आता त्यावर मात करण्यासाठी नवं रिअल टाईम अ‍ॅप सुनील शेट्टी घेऊन आला आहे.

Sunil Shetty | Insta

शारिरीक आरोग्यासोबतच आजकाल मानसिक आरोग्य (Mental Health) जपणं देखील महत्त्वाचं असल्याचं समोर आलं आहे. याच जाणिवेतून अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) याने Veda Rehabilitation & Wellness,चे सीईओ Manun Thakur यांच्यासोबत नव्या हेल्थ अ‍ॅप ची घोषणा केली आहे. 'Lets Get Happi'असं या अ‍ॅपचं नाव असून त्या माध्यमातून लोकांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी मदत दिली जाणार आहे. हे अ‍ॅप 24x7 थेरपीच्या मदतीसाठी सज्ज असणार आहे. नागरिकांना किफायतशीर दरात आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता मानसिक आरोग्य जपण्यासाठी मदत करणार आहे.

मानसिक आरोग्य जपण्यासाठी मदत घेताना नागरिकांना अनेकदा आपल्याला जज केलं जाईल याची भीती, न्युनगंड असतो. पण आता त्यावर मात करण्यासाठी नवं रिअल टाईम अ‍ॅप सुनील शेट्टी घेऊन आला आहे.

भारतामध्ये प्रामुख्याने शहरी भागातील 16-35 वर्ष वयोगटातील नागरिकांना मेंटल हेल्थ सपोर्ट देण्याचा या अ‍ॅपचा उद्देश असणार आहे. मानसोपचार तज्ञांकडून 24 तास यावर सेवा मिळणार आहे. त्यामध्ये मेडिटेशन, जर्नलिंग, असेसमेंट टेस्ट यांचादेखील समावेश असणार आहे. अ‍ॅप नागरिकांना इन पर्सन आणि ऑनलाईन थेरपी देणार आहे. त्यांच्या गरज आणि आर्थिक स्थिती नुसार त्यांना मदत उपलब्ध असेल. यामध्ये नावाची देखील गुप्तता पाळली जाणार आहे.

Android आणि iOS वर अ‍ॅप उपलब्ध

'Lets Get Happi' अ‍ॅप Android आणि iOS दोन्हीवर उपलब्ध असणार आहे. सुरूवातीला या अ‍ॅप चं सॉफ्ट लॉन्चिंग मे महिन्यात करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे 16 हजार ऑरगॅनिक डाऊनलोड्स झाले होते. आता अधिकृत लॉन्चिंग नंतर त्यामध्ये वाढ होऊन 50 हजारांच्या पार डाऊनलोड होण्याची अपेक्षा आहे.

जानेवारी 2023 मध्ये या अ‍ॅपचं अपकमिंग व्हर्जेन आणण्याचा त्यांचा मानस आहे. अ‍ॅप मध्ये एआयचा देखील वापर आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now