Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?

अवेळी ताक प्यायल्याने त्याचे शरीरावर परिणा देखील होऊ शकतात. पित्त, पोटाचे विकार होऊ शकतात.

Buttermilk (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊन मुळे लोकं घरातच असली तरी उकाड्यापासून काही त्यांची सुटका झाली नाही. उन्हाळा ब-यापैकी सुरु झाला असून त्याची झळ आपल्याला घरातही जाणवते. अशा वेळी शरीर थंड करण्यासाठी लोकांचे आवडते पेय म्हणजे ताक (Buttermilk). उन्हाळ्यात पचन्यास अगदी योग्य आणि पाचकशक्ती सुधारण्यास मदत करणारे ताक पिणे अनेक लोक पसंत करतात. ताकामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पाणी असते ज्यामुळे तुम्हाला त्वरीत उर्जा मिळते. यासाठी अशक्तपणा अथवा थकवा दूर करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते.

मात्र हे ताक पिण्याची ठराविक वेळ असते. अवेळी ताक प्यायल्याने त्याचे शरीरावर परिणा देखील होऊ शकतात. पित्त, पोटाचे विकार होऊ शकतात. Summer Tips: उन्हाळ्यात कोकम सरबत प्या, तंदुरुस्त रहा

ताक पिण्याची योग्य वेळ:

ताक पिण्याची अयोग्य वेळ:

पहाटे अथवा रात्री उशीरा कधीही ताक पिऊ नये. Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे

ताक कसे प्यावे?

चांगले विरझलेले अथवा अधमुरे दही घ्यावे. जास्त शिळे दही असेल तर ताक आंबट होते. आंबट दही अथवा ताक शरीरासाठी बाधक असते. यासाठी शक्य असल्यास ताजे दही वापरावे. दह्याच्या तीनपट पाणी दह्यात मिसळावे. दही आणि पाणी एकजीव होईपर्यंत ते चांगले घुसळून घ्यावे. घुसळण्यासाठी मिक्सरचा अथवा घुसळणीचा वापर करावा. चवीसाठी तुम्ही त्यामध्ये मीठ, साखर, जीरेपावडर, सैंधव, कोथिंबीरी टाकू शकता. हे टाकल्यामुळे पचनशक्ती सुधारते. असे ताक शरीरासाठी अतिशय उत्तम असते.

ताक नियमित पिण्यामुळे तुमच्या शरीराची कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. तसेच तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर उन्हाळ्यात दररोज ताक प्यावे. जिलाब, पोटदुखी, खोकला इतकच काय तर वजन कमी करण्यासाठी देखील ताक उपयुक्त आहे.