Suicide Prevention: WHO च्या मते महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त, यामागील कारण आणि उपाय जाणून घ्या

मागील काही काळात समोर येणाऱ्या घटनांनुसार 30 ते 40 या वयोगटातील पुरुषही करिअरच्या कारणातून, नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे.या परिस्थितीमागील कारणे आणि त्यावर शक्य होतील असे उपाय काय हे जाणून घेणार आहोत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Maxpixel)

Suicide Prevention Advice: बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आणि फॅन्स सहित सर्वांनाच मोठा धक्का दिला. सुशांतच्या निधनानंतर आत्महत्या (Suicide) आणि त्यामागील कारणे हे मुद्दे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. याच संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक आकडेवारी मांडली होती. यानुसार पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण महिलांपेक्षा 3.5 पट जास्त होते असे समोर आले होते. वास्तविक यात 65 वर्षाहून अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे म्हंटले होते मात्र मागील काही काळात समोर येणाऱ्या घटनांनुसार 30 ते 40  या वयोगटातील पुरुषही करिअरच्या कारणातून, नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे. एकूणच काय तर पुरुषांमध्ये आत्महत्यांचे विचार अधिक प्रबळ होत आहेत ही सध्याचे निरीक्षण आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आपण या परिस्थितीमागील कारणे आणि त्यावर शक्य होतील असे उपाय काय हे जाणून घेणार आहोत.

Suicidal Thoughts During Teenage: आत्महत्येचा विचार कसा झटकावा? माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सांगीतला किशोरवयातला अनुभव

पुरुषांमध्ये आत्महत्येचे विचार प्रबळ का असतात?

- आपला समजा हा महिलांना समानता मिळावी या साठी पुढाकार घ्यायला शिकत आहे. निश्चितच ही कौतुकाची बाब असली तरी याच कारणातून बऱ्याचदा पुरुषांच्या भावनांकडे दुर्लक्ष होते.

- पुरुषांना एक ठरवून दिलेली स्ट्रॉंग भूमिका पार पाडण्यासाठी शिकवले जाते. परिणामी बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करणे त्यांना जमत नाही आणि याच भावना साचत गेल्या तर असा उद्रेक होतो.

- पुरुषांचे रडणे हे भावने पेक्षा मस्करीच्या दृष्टीने पाहिले जाते.

- व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त असल्यास त्यामुळे सुद्धा अनेकदा नैराश्य येऊ शकते.

- काम करण्याच्या, पैसे कमावण्याच्या जबाबदाऱ्या या अधिक सोपवण्याऐवजी लादल्या जातात.

-रंग, रूप, शरीरावरुन अनेकदा हिणवले जाते.

- वैवाहिक जीवनात समस्या असल्यास पुरुषाला नेहमीच अन्याय करणारा म्हणून ओळखले जाते.

आत्महत्येचे विचार येऊ नयेत यावर उपाय काय?

-बोलायला शिका! तुम्हाला काय वाटतं ते बोला.तुम्हाला काय हवं नको हे ठरवा त्यानुसार निर्णय घ्या.

- नेहमी हसत आनंदी राहणंच गरजेचे आहे असे समजू नका. दुःख किंवा तणाव सुद्धा स्वीकारा, त्यावर मात करा.

-हल्ली सोशल मीडियावर तुम्हाला तणावातून मुक्त करतील असे अनेक मार्ग आहेत, स्टँडअप कॉमेडी पासून ते मिम्स पर्यंत हे सगळे मार्ग ट्राय करायला हरकत नाही.

-प्रोफेशनल मदत घेण्याची वेळ आल्यास, किंवा गरज भासल्यास त्यात कोणताही कमीपणा बाळगू नका.

-गोष्टी सोडून द्यायला शिका.

-इतरांमध्ये मदत शोधायच्या ऐवजी स्वतःला वेळ द्या. स्वतः स्वतःचा आधार बनणे आवश्यक आहे.

जगभरात पुरुष हा एका संदुकीप्रमाणे बंद राहावा अशी अपेक्षा केली जाते, ही संदूक अनेक विचार, अविचार, भावभावना स्वतःत भरून ठेवत असते मात्र कधीतरी जेव्हा हे प्रमाण संपते तेव्हा जीव देण्याचा विचार हा लोकांना अधिक जवळचा वाटतो. मात्र या विचारात वाहून जाऊ नका, कुठे थांबायचं हे जाणून घ्या. इतरांची मदत करा.. स्वतःची मदत करा!



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif