Covid New Variant BF7: चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं
ताप, घसादुखी, खोकला, नाक वाहणे, अशक्तपणा आणि थकवा ही या व्हेरिएंटची मुख्य लक्षणे आहेत.
Covid New Variant BF7: चीन (China) मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तेथील रुग्णालयेही रुग्णांनी तुडुंब भरू लागली आहेत. सध्या चीनमध्ये कोरोनाची ही लाट Omicron च्या BF7 प्रकारामुळे आली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उद्रेकादरम्यान हा प्रकार भारतातही पोहोचला आहे. गुजरातमधील दोन रुग्ण आणि ओडिशातील एक रुग्ण BF.7 प्रकाराने ग्रस्त असल्याचे आढळले आहे. आता लोक विचार करत आहेत की, हे BF7 प्रकार काय आहे? आणि हा व्हेरिएंट इतका धोकादायक का आहे? या व्हेरिएंटची नेमकी लक्षणं काय आहेत? जाणून घेऊयात...
BF.7 व्हेरिएंट -
कोरोनाचा BF.7 प्रकार (Corona New Variant BF7) अनेक देशांमध्ये अतिशय धोकादायक मानला जात आहे. जेव्हा कोणताही विषाणू म्यूटेट होतो, तेव्हा तो स्वतःचे रूपे आणि उप-रूपे तयार करतो. त्याचप्रमाणे, SARS-CoV-2 विषाणू हा कोरोनाचा मुख्य स्टेम आहे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आणि उप-प्रकार आहेत. BF.7 हा देखील Omicron चा उप-प्रकार आहे. सेल होस्ट अँड मायक्रोब या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, BF.7 सबवेरियंटमध्ये मुख्य प्रकारापेक्षा 4.4 पट अधिक न्यूट्रलाइजेशन रेजिस्टेंस आहे. परिणामी, लोकांमध्ये उपस्थित अँटीबॉडीज BF.7 नष्ट करण्यास कमी सक्षम असतात. (हेही वाचा -Year Ender 2022: यावर्षी 'या' 5 आजारांनी केलं लोकांचं जीवन उद्ध्वस्त; 'या' आजाराच्या कहरामुळे सर्वाधिक मृत्यू)
भारतातही झाली BF.7 व्हेरिएंटची एन्ट्री -
BF.7 प्रकार भारतात देखील दाखल झाला आहे, परंतु तो फारसा धोकादायक नाही. जानेवारी 2022 मध्ये भारतात कोरोनाची लाट ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 उप-प्रकारांमधून आली. सध्या, एक प्रकार XBB भारतात सर्वात धोकादायक मानला जातो आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात भारतात 65.6 टक्के प्रकरणे आढळून आली.
BF.7 व्हेरिएंटची लक्षणे -
कोरोनाच्या या प्रकाराचे बळी फक्त कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक आहेत. ताप, घसादुखी, खोकला, नाक वाहणे, अशक्तपणा आणि थकवा ही या व्हेरिएंटची मुख्य लक्षणे आहेत. त्याचबरोबर काही लोकांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारीही दिसून आल्या आहेत.