तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण तुम्हाला होऊ शकतात 'हे' आजार
जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल असाल तर त्याचे काय नुकसान आहे? जाणून घ्या
आपल्या सर्वांनाच जेवण झाल्यानंतर किंवा आधी तहान लागते. आजचा विषय किती पाणी प्यायले पाहिजे हा नसून पाणी उभे राहून प्यायले पाहिजे कि बसून हा आहे. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल असाल तर त्याचे काय नुकसान आहे? जर तुम्ही बसून पित असाल तर त्याचे काय फायदे आहेत? आधी आपण जाणून घेऊयात दिवसाला किती पाणी प्यायले पाहिजे. तसे, पाणी पिण्याची चांगली सवय आहे. त्यामुळे बऱ्याच आजरांपासून आपण लांब राहतो. पाणी पिल्याने तुमच्या शरीरातुन टॉक्सिन्सबाहेर पडते. तसेच इंफ्लेमेशन, वाईटव्हायरस शरीरात थांबत नाहीत. हवामानात बदल झाल्याने पाणी सर्दी व थंडीचा त्रासही दूर करते. पाण्याचे प्रमाणाबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या आरोग्यासाठी दररोज दोन ते अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. (Health Tips: 'ही' फळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता येऊ देणार नाहीत, उन्हाळ्यात करा या फळांचे सेवन )
जेवण झाल्यावर लगेच पाणी का पिऊ नये
असे म्हणतात की अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. अन्न खाल्ल्यानंतर सुमारे अर्धा ते एक तास पाणी पिऊ नये. लगेच पाणी पिने पाचन क्रिया बिघडवते आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे.
उभे राहून पाणी पिण्याचे तोटे
उभे राहून पाणी पिण्याचे बरेच नुकसान आहेत, त्यातील एक मूत्रपिंडाचा रोग आहे आणि दुसरे म्हणजे आर्थराइटिसची समस्या. तथापि, इतरही अनेक ही तोटे आहेत जाणून घेऊयात सविस्तर.
पोटाचा आजार
उभे राहून पाणीपिल्यास ते अन्न फूड पाईप द्वारा पोटात जलद प्रवेश करते. हे सभोवतालच्या अवयवांचे आणि पोटाचे नुकसान करते याने पचनक्रिया ही खराब होते.
अपचनाची समस्या
जेव्हा तुम्ही बसलेले असता तेव्हा मसल्स आणि नर्वस सिस्टम रिलॅक्स असतात त्यामुळे पाणी सहज पचते. उभे राहून पाणी पिटाना अपचनाची समस्या निर्माण होते.
मूत्रपिंडाशी संबंधित समस्या
किडनी फंक्शन म्हणजे पाणी योग्यरित्या फिल्टर करणे. उभे राहून आणि पाणी पिताना त्याचे हे कार्य योग्यरित्या करण्यात अक्षमहोते . यामुळे, पाणी योग्य प्रकारे फिल्टर होत नाही. मूत्र स्वच्छ येत नाही आणि मूत्रपिंडात घाण थांबते. यामुळे मूत्रपिंडाचा त्रास, संसर्ग आणि जळजळ होण्याची शक्यता असते.
संधिवात हे आणखी एक कारण आहे
उभे राहून पाणी पिल्याने पाणी थेट गुडघ्यात उतरते . म्हणजेच, सांध्यामध्ये उपस्थित असलेल्या द्रवांचे संतुलन बिघडते ज्यामुळे सांधेदुखीची समस्या सुरू होते.
बसून पाणी पिण्याचे फायदे
बसून पाणी पिल्याने ते पाणी योग्य प्रकारे पचते आणि पेशींमध्ये पोहोचते. शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचे शरीरात राहते आणि उर्वरित पाणी मूत्रमार्गाने शरीरातून बाहेर पडते. यामध्ये बॉडी टॉक्सिन देखील सामील आहेत.
गरम पाणी पिल्याने जास्त चरबी होत नाही आणि वजन कमी होत नाही.
पाणी रक्तामध्ये हानिकारक पदार्थ विरघळवून देत नाही. उलट ते रक्त शुद्ध करते.जेव्हा तुम्ही सावकाश घेत पाणी पिता तेव्हा पोटात अॅसिडची पातळी वाढत नाही. उलट वाईट अॅसिड शरीरातून बाहेर येते.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)